क्रिकेट खेळाचा देवता समजला जाणारा सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती काही-ना-काही कारणामुळे सतत चर्चेत असते. तिने शेअर केलेले फोटो लोकांना खूप आवडतात. नुकताच तिने आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. त्या व्हिडीओमुळे बाकी लोकांप्रमाणे तिही ट्रोलिंगची बळी ठरली. मात्र ट्रोल करणाऱ्या महिलेला तिने दिलेले सणसणीत प्रत्युत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
साराने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओत ती कारमध्ये बसलेली असून हातामध्ये कॉफीचा मग पकडला असल्याचे दिसत आहे. यावर एका महिला सोशल मीडिया वापरकर्तीने भाष्य करताना म्हटले आहे की, “तू तुझ्या वडिलांचे पैसे वाया घालवत आहेस.”
त्या महिलेने केलेल्या भाष्याचा साराने स्क्रीनशॉट काढून आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत याचे सडेतोड उत्तर दिले. तिने यावर “हम्म, कॉफीवर जे काही पैसे खर्च केले जातात, ते चांगलेच असतात वाईट नाही (मग ते कोणाचेही असो).” साराची ही ट्रोलरला उत्तर देण्याची पद्धत वापरकर्त्यांना खूप आवडली आहे.
विशेष म्हणजे, या स्क्रीनशॉटवरून या महिलेने साराचा भाऊ अर्जुन तेंडुलकरलाही ट्रोल केले असल्याचे समोर आले आहे. जेव्हा अर्जुन तेंडुलकरची 20 लाख रुपयांमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात निवड झाली; तेव्हाही या महिला वापरकर्त्याने त्याची खिल्ली उडविली होती. या महिलेने अर्जुनला “सर्वात कमी किंमतीची व्यक्ती” म्हणून संबोधले होते. त्यावेळी साराने त्या महिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, परंतु यावेळी तिने योग्य उत्तर देऊने तिची बोलती बंद केली.
सारा अशा ट्रोलिंगला क्वचितच बळी पडल्याचे दिसते. बरेचदा ती तिच्या इन्स्टाग्रामवर एकापेक्षा एक असे सुंदर फोटो शेअर करते. अगदी ती तिच्या फॅशन कल्पनांनी बॉलिवूड सेलिब्रिटींशी देखील स्पर्धा करते. जरी ती मनोरंजनाच्या जगतापासून दूर असली, तरीसुद्धा सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते आहेत. तिच्या कुटूंबाशी ती खूप जवळ असून बर्याचदा कुटूंबासमवेत वेळ घालवतानाही दिसते.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटपटू कम गुरू! सामन्यानंतर शाहरुखने घेतली धोनीची भेट; चाहते म्हणाले, ‘मास्टर माही’
सामना सुरू असताना धोनीने शाहरुखच्या कानात काय सांगितले होते? खुद्द ‘थाला’नेच केला खुलासा
CSKvPBKS: कोण आहेत हे माय-लेक, ज्यांनी लाखो सामना दर्शकांचे वेधले लक्ष? घ्या जाणून