---Advertisement---

‘तुझी बहीण असल्याचा मला…’, अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर साराची लक्षवेधी पोस्ट; एकदा पाहाच

On: गुरूवार, डिसेंबर 15, 2022 5:23 PM
Sara-Tendulkar
---Advertisement---

‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. अर्जुनने रणजी ट्रॉफी पदार्पण करताच 34 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अष्टपैलू म्हणून पदार्पण करणाऱ्या अर्जुनने शानदार शतक झळकावले आहे. त्याने यादरम्यान 120 धावांची शतकी खेळी केली. अर्जुनच्या रणजी शतकावर त्याची बहीण सारा तेंडुलकर हिने भावूक प्रतिक्रिया दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाली सारा तेंडुलकर?
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या पदार्पणाची जोरदार प्रशंसा होत आहे. अशात त्याची बहीण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने इंस्टाग्रामवर अर्जुनच्या पदार्पणाचे कौतुक केले आहे. सारा तेंडुलकर हिने स्टोरीमध्ये लिहिले की, “तुला तुझ्या मेहनतीचे आणि धैर्याचे आता फळ मिळत आहे.” तसेच तिने पुढे लिहिले की, “तुझी बहीण असल्याचा मला अभिमान आहे.”

Sara-Tendulkar-Insta-Story
Photo Courtesy: Instagram/saratendulkar

खरं तर, अर्जुन यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळत होता. मात्र, या हंगामात तो गोवा संघाच्या ताफ्यात सामील झाला. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केले आहे.

Sara-Tendulkar-Insta-Story
Photo Courtesy: Instagram/saratendulkar

गोव्याचा हा सामना राजस्थानविरुद्ध सुरू आहे. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पहिल्या दिवसाच्या खेळात तो 4 धावांवर नाबाद होता. मात्र, त्याने त्याच्या खेळात 2 षटकार आणि 16 चौकार मारले. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही 15 वर्षांच्या वयात प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. त्यानेही पहिल्याच सामन्यात शतक झळकावत नाबाद खेळी साकारली होती. सचिनने ही कामगिरी 178 चेंडूत केली होती. सध्या अर्जुन 23 वर्षांचा आहे.

अशात या पदार्पणानंतर त्याला आयपीएलमध्येही खेळण्याची संधी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे. मुंबईने त्याला 2022च्या आयपीएल लिलावात 30 लाखांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. (sachin tendulkar daughter sara tendulkar emotional after arjun tendulkar debut century in first class match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! 3 वेळा हवेत उडाला चेंडू, तरीही धडपडत घेतला कॅच; संघसहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही पसरला आनंद
VIDEO: बांगलादेशी गोलंदाजांची उमेश यादवने वाजवली बॅंड, दुसऱ्याच चेंडूवर ठोकला 100 मीटरचा षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---