---Advertisement---

लाडक्या लेकीने बनवलेला खास पदार्थ सचिन तेंडुलकरने केला काही सेंकदातच फस्त!

On: गुरूवार, मे 7, 2020 11:51 PM
---Advertisement---

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वैयक्तिक छंदाबाबात बोलायचे झाले, तर त्याला खायला खूप आवडते. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वडील दिवसभर घरी असल्याची संधी साधून, सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने त्याच्यासाठी बीट कबाब बनवले होते आणि सचिनलाही ते खूप आवडले. विशेष म्हणजे, त्याने जवळपास ६० सेकंदात प्लेट साफ करून टाकली.

यासंदर्भातील माहिती स्वत: सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. त्याने हातात प्लेट पकडून साराबरोबरचाही फोटो शेअर केला आहे. एका फोटोत सचिनने कबाब असलेली प्लेट हातात पकडली आहे. तर, दुसऱ्या फोटोत तो रिकामी प्लेट घेऊन सारासोबत उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोखाली कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, “६० सेकंदात पूर्ण प्लेट साफ करून टाकली. एवढ्या चविष्ट बीट कबाबसाठी, धन्यवाद सारा.”

https://www.instagram.com/p/B_2mdBrlPDu/

सचिनच्या या फोटोला आतापर्यंत ९ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. अनेक मुलाखतीत सचिनचे संघ सहकारी क्रिकेटपटू त्याच्या खाण्याच्या आवडीबाबत सांगत असतात. त्याच्या आवडत्या पक्वानांमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ‘वडापाव’चाही समावेश आहे. याव्यतिरिक्तही त्याला अनेक पदार्थ आवडतात.Sachin tendulkar finished beetroot kebabs in just 60 seconds which cooked by daughter sara.

कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्व क्रिडा क्षेत्र ठप्प पडले आहे. बीसीसीआयने इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएललाही अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. नाही तर, सचिन आता त्याच्या मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएलमध्ये व्यस्त असला असता.

ट्रेंडिंग घडामोडी-

रोहित म्हणतो; ३ महिन्यांच्या गॅपनंतर फलंदाजांसमोर असणार हे सर्वात मोठे आव्हान

विराटची ती एक गोष्ट आंद्रे रसेलला चांगलीच खटकली, मग केली आरसीबीची…

विराट आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात युवा कर्णधार, नावावर आहे धोनीपेक्षा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---