नुकत्याच टोकियो पॅरालिम्पिक्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये भारताने चांगली कामगिरी केली. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकून इतिहासात त्याचे नाव लिहिले आहे. पॅरालिम्पिक्समध्ये पदक जिंकणाऱ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या कौतुकाची थाप देणाऱ्यांच्या यादीत आता सचिन तेंडुलकर याचेही नाव सामील झाले आहे. त्याने ओडिसाच्या प्रमोद भगतला एक खास भेट दिली आहे. सचिनने त्याला त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीच्या २०० व्या आणि शेवटच्या सामन्यात घातलेली जर्सी भेट दिली आहे. यानंतर प्रमोदने इंस्टाग्राम पोस्टमधून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रमोदने पोस्टमध्ये लिहिले की, “माझे आदर्श सचिन तेंडुलकर सरांनी मला पाठवलेली भेट उघडताना माझे हृदय जास्त वेगात धावत होते. त्यांनी माझ्यासाठी त्यांच्या २०० व्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी भेट देऊन पुन्हा माझे ह्रदय जिंकले आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. या अद्भूत भेटीसाठी सचिन सरांचे आभार.”
My adrenaline was running high while opening this gift sent to me by my idol @sachin_rt , he stole my heart yet again by gifting me the Jersey worn by him in his 200th Test match for India 🇮🇳 , words are falling short.
Thank you Sir Sachin Tendulkar for this wonderful gift 🙌🏻🙌🏻 pic.twitter.com/VSiAd22P2o
— Pramod Bhagat (@PramodBhagat83) September 20, 2021
काही दिवसांपूर्वी प्रमोद सचिन तेंडुलकारांना भेटला होता आणि त्याने याबाबत आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “माझा विश्वास बसत नाही की, मी किती आनंदी आहे. लहान असताना मी नेहमीच सचिन तेंडुलकर सरांकडून प्रेरणा घेऊन सकारात्मक आणि आत्मविश्वास मिळवायचो. मी नेहमी कल्पना केली होती की, एक दिवस मला तुम्हाला भेटायची संधी मिळेल. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कामगिरीनंतर यावा अशी माझी इच्छा होती आणि देवाने माझ्यासाठी सर्व तारे एकारेषेत आणले आहेत.”
“मी पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकले. पदक जिंकल्याचा आनंदही शांत झाला नव्हता. तेवढ्यात, मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. मला सुरुवातीला शब्द कमी पडत असल्यासारखे वाटत होते. कारण माझा विश्वास बसत नव्हता की, मी तुमच्या शेजारी बसलो होतो. तुमचा दयाळूपणा मनाला स्पर्श करणारा होता,” असेही त्याने पोस्ट केले होते.
“तुम्ही माझ्यासोबत बोललेले शब्द कायम माझ्यासोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. मला आज रात्री झोप येणार नाही,” असेही त्याने पोस्टमध्ये लिहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आयपीएलमध्ये कोणाकडे तीक्ष्ण मेंदू असेल तर तो एमएस धोनीकडे आहे’, सेहवागने उधळली स्तुतीसूमने