---Advertisement---

भारतीय संघाच्या मदतीला आला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, दिले महत्वाचे सल्ले

On: गुरूवार, जून 17, 2021 1:39 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे तास उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशात माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला गुरु मंत्र दिला आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाची प्लेईंग ११ काय असायला हवी यावर सचिनने सांगितले, “साउथॅम्पटनच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना जरी मदत मिळाली नाही तरी, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकी जोडी त्या खेळपट्टीवर प्रभावी मारा करू शकते. तसेच भारतीय संघाने ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांसोबत खेळावे. कारण अश्विन आणि जडेजा खालच्या फळीत फलंदाजीसुद्धा करतात.”

जेव्हा सचिनला विचारले गेले की, चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीमधून साथ नाही मिळाल्यास काय होणार? यावर सचिन सांगतो, “मुरलीधरन आणि शेन वार्नसुद्धा खेळपट्टीमधून मदत न मिळाल्यास ‘सरळ चेंडू’चा वापर करीत असे. कारण फलंदाज नेहमी स्पिनसाठी खेळायला तयार असतो पण सरळ चेंडूमध्ये फसतो आणि बाद होतो.”

अश्विन आणि जडेजाला इंग्लंडच्या थंड वातावरणाचा आणि हवेचा फायदा घेता आला पाहिजे. इंग्लंडच्या खेळपट्टी वर फिरकी गोलंदाजाना हवेची चांगली साथ मिळते. जर चेंडूची चमक जास्त काळ टिकून राहिली तर, चेंडू वळवण्यास दोन्ही गोलंदाजांसाठी सोपे जाईल. सचिनने सलामी फलंदाज रोहित आणि गिल यांना सुद्धा सल्ले दिले की, “दोन्ही फलंदाजांनी शरीराच्या जवळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करावा. फलंदाजी करताना शरीराच्या जेवढ्या जवळचा चेंडू खेळता येईल तेवढा खेळावा.” (Sachin Tendulkar gives tips to India openers ahead of WTC final)

सचिन सांगतो की, “दोन्ही संघाची गोलंदाजी मजबूत आहे. परंतु, २ कसोटी सामने खेळून आलेला न्यूझीलंड संघाची गोलंदाजी जास्त मजबूत वाटते आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीत विविधता आहे. टीम साउदी जो उजव्या हाताच्या फलंदाजांना त्रास देतो. ट्रेंट बोल्ट चेंडू आत-बाहेर दोन्ही स्विंग करतो आणि नील वॅगनर आखूड टप्याच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

घे बाबा रुमाल आणि खेळ! हसन अली आणि बाबार आझमचा मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

लईच भारी! जेव्ह पती विराटला आपल्यासाठी गाणं म्हणताना भावूक झाली होती अनुष्का शर्मा, व्हिडिओ होतोय व्हायरल

न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक जिंकला असता तर ‘या’ दिग्गज खेळाडूने घेतली असती निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---