भारतीय संघाचा (team india) महान फलंदाज आणि चाहते ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात असा सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी व्यक्त झाला आहे. सचिन तेंडुलकरने दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट खेळीचा खुलासा केला आहे. तसेच कारकिर्दीतील सर्वात्कृष्ट क्षणाचीही माहिती दिली आहे.
सचिन तेंडुलकरणे कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर केले. परंतु काही क्षण असे असतात जे आयुष्यभर लक्षात राहतात. जागतिक क्रिकेटमधील सचिन एकमेव फलंदाज आहे, ज्याने स्वतःचे १०० शतक पूर्ण केले आहेत. या आकड्यापर्यंत इतर कोणता खेळाडू पोहोचू शकलेला नाही. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आयुष्यातील २४ वर्ष त्याने भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये घालवली आहेत, जी एक मोठी उपलब्धी आहे.
विश्वचषक जिंकणे होता सर्वात्तम क्षण
स्पोर्टस्टारशी बोलताना सचिन म्हणाला की, “२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची बरोबरी कशाचीच होऊ शकत नाही. तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात्तम क्षण होता. तुम्ही याच दिवसासाठी खेळत असता. मला २४ वर्षांपर्यंत स्वतःच्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आणि करोडो लोकांच्या वतीने मी विश्वचषक ट्रॉफीही उचलली. जे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट होती. त्यामुळे मला नेहमी असेच वाटते की, केवळ थोड्या लोकांसाठी नाही, तर एक अरब आणि ३९ करोड लोकांनी विश्वचषकाची ट्रॉफी आणण्यासाठी स्वतःचे योगदान दिले. ही त्या सर्व लोकांना समर्पित आहे.”
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २०१० मधील खेळी होती सर्वात उत्कृष्ट
सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा अविस्मरणीय खेळ दाखवला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २०१० साली त्याने द्विशतक ठोकलो होते, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे सचिन म्हणाला. सचिनने पुढे बोलताना सिंगतले की, “दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २०१० मध्ये केलेले द्विशतक माझी सर्वात उत्कृष्ट खेळी होती. त्यांचे गोलंदाजी आक्रमण खूप अप्रतिम होते आणि संघही भक्कम स्थितीत होता. इतिहासातील ही पहिलीच वेळ होती, जेव्हा एखाद्या एकदिवसीय सामन्यात २०० धावा केल्या गेल्या होत्या. त्यामुळे या खेळीचे एक वेगळेच महत्व आहे.”
महत्वाच्या बातम्या –
विराटनंतर ‘असा’ असेल भारताचा नवीन कसोटी कर्णधार; बीसीसीआय अध्यक्षांशी दिली माहिती
अनिल कुंबळेंना का सोडावे लागले होते संघाचे मुख्य प्रशिक्षकपद? पाच वर्षानंतर झाला खुलासा
U19 WC FINAL| नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय