---Advertisement---

U19 WC FINAL| नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने; प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 6:08 PM
eng v ind u19
---Advertisement---

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा (Under 19 World Cup) अंतिम सामना अँटिग्वा येथे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात (U19 World Cup Final) सुरू झाला आहे. सामन्यापूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार टॉम प्रेस्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दोन्ही संघात झाले नाहीत बदल

या अंतिम सामन्यासाठी उभय संघांनी आपल्या संघात कोणतेही बदल केले नाहीत. उपांत्य फेरीतील संघात यांनी कायम केले. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार यश धूलने या मैदानावर आपल्यालाही प्रथम फलंदाजी करायला आवडली असती. अशी प्रतिक्रिया दिली.

अंतिम सामन्यासाठी उभय संघाची प्लेईंग इलेव्हन

भारत
अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, यश धूल (कर्णधार), शेख राशीद, राज बावा, दिनेश बाना, कौशल तांबे, निशांत सिंधू, राजवर्धन हंगारगेकर, रवी कुमार व विकी ओस्तवाल.

इंग्लंड
जॉर्ज थॉमस, जेकब बेथल, टॉम प्रेस्ट (कर्णधार), जेम्स रिव, विलियम लक्सटन, जॉर्ज बेल, रेहान अहमद, जेम्स सेल्स, थॉमस एस्पिनवॉल व जोश बायडेन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---