टेनिस मधील सर्वात प्रतिष्ठित विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. या सामन्यात 21 वर्षीय स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्कारेजनं तुफानी कामगिरी करून इतिहास रचला आहे. त्यानं अंतिम सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2, 7-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. अल्कारेजच्या या विजयानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया ‘एक्स’ प्लॅटफाॅर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यानं लिहलं आहे की, “यापुढे टेनिसवर एकच खेळाडू राज्य करेल, तो म्हणजे अल्काराज”. सचिन तेंडुलकरनं विजेतेपद जिंकल्याबद्दल अल्काराजचं अभिनंदन केलं आणि म्हटलं की, “जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सरळ सेटमध्ये विम्बल्डन फायनल जिंकणं काही विनोद नाही. अशा प्रकारची गती, शक्ती, स्थान आणि उर्जा, कार्लोस अल्काराजसाठी पुढील काही वर्षांत फायदेशीर ठरेल असं दिसत आहे.”
नोव्हाक जोकोविचचं कौतुक करताना सचिन म्हणाला की, “जोकोविचनं ज्या प्रकारे स्वत:ला सभ्यता आणि विजय-पराजयामध्ये सादर केलं आहे त्याला सलाम, माझ्यासाठी हीच खऱ्या खेळाडूची ओळख आहे”. अल्कारेज आणि जोकोविच यांच्यातील हा जेतेपदाचा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. अल्कारेजनं सुरुवातीपासूनच सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. पहिले दोन सेट त्याने जिंकले होते. यानंतर जोकोविचने तिस-या सेटमध्ये थोडाफार संघर्ष केला, पण त्याला सेट जिंकता आला नाही.
𝘈𝘣𝘴𝘦 𝘵𝘦𝘯𝘯𝘪𝘴 𝘱𝘦 𝘦𝘬 𝘩𝘪 𝘳𝘢𝘫 𝘬𝘢𝘳𝘦𝘨𝘢, 𝘸𝘰𝘩 𝘩𝘢𝘪 𝘈𝘭𝘤𝘢𝘳𝘢𝘻.
Winning the @Wimbledon finals in straight sets against a world-class opponent is no joke. With that kind of speed, power, placement, and energy, it looks like it’s going to be Advantage… pic.twitter.com/fqINU1HxOr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 14, 2024
37 वर्षीय जोकोविचनं अंतिम सामना जिंकला असता तर त्यानं इतिहासात स्वत:चं नाव कोरलं असतं. या विजयासह जोकोविचला टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदं (पुरुष आणि महिला) जिंकणारा खेळाडू बनण्याची संधी होती. परंतु अल्कारेजनं त्याचं स्वप्न भंग केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतानं ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग कधी घेतला? पहिलं पदक कधी जिंकलं? संपूर्ण इतिहास जाणून घ्या
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
‘हिटमॅन’च्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी! टी20 नंतर रोहित वनडे आणि कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार?