क्रिकेटपटूंनी अंधश्रध्दा आणि लकी चार्म सारख्या गोष्टी मानणे, या सर्वसामान्य गोष्टी आहेत. ते खराब फॉर्म मधून निघण्यासाठी कित्येक प्रकारचे काम करताना दिसून येतात. असाच एक किस्सा सचिन तेंडुलकर सोबत जोडला गेला आहे. ज्याचा खुलासा त्यांनी केला आहे. सचिनने सांगितले की त्यांनी 2004 साली ऑस्ट्रेलिया दौर्यावर असताना एक गाणे पाच दिवस ऐकले होते. त्यानंतर नाबाद 241 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीच्या तीन कसोटी सामन्यात सचिनने 88 धावा केल्या होत्या. त्याने 3 डावात 10 चा आकडा सुद्धा पार केला नव्हता. तर दोन वेळा खातेही न उघडता तंबूत परतला होता.
सचिन मैदानाच्या आत आणि बाहेर एकच गाणे ऐकत होता
सचिनने आपल्या यूट्युब चॅनेलवर एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “2004 साली मी सिडनी कसोटीत 241 धावांची मी 241 धावांची नाबाद खेळी केली होती. तेव्हा पाच दिवसापर्यंत एकच गाणे गायले होते. हे गाणे ब्रायन एडम्सच्या 69 च्या समरचे होते. मी प्रवास करताना, ड्रेसिंग रूम, जेवणाच्या, चहाच्या वेळेत सामन्याच्या पूर्वी, त्यांनंतर प्रत्येक वेळी एकच गाणे गुणगुणत होतो आणि इतर दुसरे काही ऐकत नव्हतो. ”
“2003 मध्ये सूर अल्बमचे गाणी ऐकत होतो”
सचिनने 2003 साली वनडे विराट मध्ये सर्वात जास्त 673 धावा केल्या होत्या. याबद्दल ही सचिनने खुलासा केला आहे. तो म्हणाला, ” ला आठवतं आहे, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2003 च्या विश्वचषकात मी लकी अलीच्या ‘सूर’ अल्बम मधील गाणी ऐकत असायचो. यानंतर माझ्या खेळीत खुप सुधारणा पाहायला मिळाली होती.
सचिनने 2013 मध्ये घेतली निवृत्ती
सचिनने कारकिर्दीतील 200 व्वा कसोटी सामना खेळल्यानंतर 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत ही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. त्याने 200 कसोटी सामन्यात 15,921 आणि 463 वनडेत 18,426 धावा काढल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव टी-20 सामना खेळताना 10 धावा केल्यात. आयपीएल मध्ये सचिनने 78 सामने खेळताना एका शतकासह 2334 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या:
– शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या या तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
– सचिन घेतोय सुट्ट्यांचा आनंद; मुलगी सारा सोबतचे फोटो जोरदार व्हायरल
– रोहितच्या निवडीबाबत सचिनचे मोठे वक्तव्य; म्हणाला