भारत- इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये 20 जून पासून कसोटी मालिकेची सुरुवात होईल. 4 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणाऱ्या या मालिकेत एकूण पाच सामने खेळले जाणार आहेत. आहेत या मालिकेसोबतच भारतीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल (Shubman gill) आणि गौतम गंभीर (Gautam gambhir) टीम इंडियाचे (Team india) नेतृत्व करतील. रोहित शर्माने (Rohit Sharma retired from test cricket) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार निवडण्यात आले आहे. टीम इंडिया या मालिकेबरोबरच आयसीसी वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढच्या चक्राची सुरुवात करेल.
तसेच या मालिकेत ज्या खेळाडूवर सर्वांची नजर असणार आहे तो खेळाडू आहे जो रूट (jo Root). जो रूट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याच्या नजरा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करून सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे सोडण्यावर असतील.
रेकॉर्डच्या यादीत सचिन तेंडुलकर नेहमी अव्वल स्थानावर असतो, पण भारत इंग्लंड मधील कसोटी इतिहासात सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये असे नाही. या यादीमध्ये इंग्लंडचा जो रूट वरच्या स्थानी आहे. मात्र 4 खेळाडू असे आहेत ज्यांनी 2000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच फक्त दोन फलंदाज 2500 पेक्षा अधिक धावा पार करू शकले आहेत.
जो रूट, इंग्लंडच्या या दिग्गज फलंदाजाने 2012 ते 2024 पर्यंत भारताविरुद्ध 29 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 55 डावात 58.08 च्या सरासरीने 200846 धावा त्याने केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. जो रूटची सर्वश्रेष्ठ पारी 218 धावांची राहिलेली आहे.