Ricky Ponting Statement On Sai Sudharsan: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीनंतर, ही मालिका नवीन कसोटी कर्णधार गिलची परीक्षा घेईल. रोहित-कोहलीच्या जाण्यामुळे फलंदाजी क्रमातील पोकळी कोण भरून काढणार हा देखील मोठा प्रश्न आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) यशस्वी जयस्वालसह इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून पाहू इच्छिणाऱ्या फलंदाजाचे नाव दिले आहे. पॉन्टिंगने केएल राहुलकडे दुर्लक्ष केले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, रिकी पॉन्टिंगने यशस्वी जयस्वालचा सलामीवीर जोडीदार म्हणून साई सुदर्शनचे नाव सुचवले आहे. (Sai Sudarshan to open alongside Yashasvi Jaiswal on England tour) तो म्हणाला, “मी हे या कारणासाठी म्हटले आहे कारण जर तो यशस्वी जयस्वालसोबत गेला आणि त्याचा साथीदार साई सुदर्शन असेल, तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाजाची आवश्यकता असेल. या परिस्थितीत केएल राहुल किंवा करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतात.”
पुढे बोलताना म्हणाले, “त्याच वेळी, शुबमन गिल चौथ्या क्रमांकाचे स्थान सांभाळू शकतो. जेव्हा तुम्ही या स्थानावर स्वतःला फिट करता तेव्हा तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर परत येऊ शकता. माझ्या मते, सुदर्शनसाठी भारतीय संघात येण्याची ही योग्य वेळ आहे. विराट-रोहितच्या अनुपस्थितीमुळे, आता भारतीय संघात आता नव अनुभव तयार होईल. प्रत्येक संघ यातून जातो. मला वाटते की सुदर्शन भारतीय संघात येण्यास पूर्णपणे तयार आहे.”
आयपीएल 2025 मध्ये साई सुदर्शनची कामगिरी उत्कृष्ट होती. गुजरात टायटन्सकडून खेळताना, सुदर्शनने 15 सामन्यांमध्ये 54च्या सरासरीने आणि 156च्या स्ट्राईक रेटने 759 धावा केल्या. सुदर्शन या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता. इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात सुदर्शनने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली.






