मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने एक -दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे. मागील दोन्ही मोसमांचा विजेता देखील हाच संघ राहिलेला आहे, यावरून स्पर्धेमधील मुंबई संघाच्या कामगिरीचा अंदाज लावला जाऊ शकतो. यावेळी संघाची नजर विजेतेपदाच्या हॅट्रिकवर आहे. यासाठी मुंबईच्या संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
लवकरच संघाच्या या तयारीमध्ये एक अनुभवी व्यक्तीही जोडला जाईल. ही व्यक्ती इतर कोणी नसून संघाचा माजी खेळाडू महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. जो लवकरच यूएईमध्ये संघाच्या प्रशिक्षणात दिसू शकतो.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सचिन यूएईमध्ये पोहोचल्याची माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या खाhttps://twitter.com/mipaltan/status/1436990556165443594त्यावर एका सूटकेसचा फोटो पोस्ट केला आहे, जो निळ्या रंगाचा आहे. या सूटकेसवर मुंबई इंडियन्सचा लोगो बनवण्यात आला आहे आणि त्याच्या अगदी खाली सचिन तेंडुलकरचे नाव लिहिले आहे. तसेच त्यांनी सचिन युएईला पोहचल्याचा ‘स्वागत आहे’, असे कॅप्शन टाकत एक व्हिडिओही शेअर केला आहे. सचिन मुंबई इंडियन्सचा आयकॉन आहे.
😍⏳🤩#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @sachin_rt pic.twitter.com/vtmCQT1J1h
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2021
स्वागत आहे 🙏#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @sachin_rt @MXTakaTak MI TV pic.twitter.com/py8HW6mJAG
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2021
सचिनला संघाच्या प्रशिक्षण सत्राचा भाग बनण्यापूर्वी सहा दिवस विलगिकरणात राहावे लागेल. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला प्रशिक्षण देताना दिसू शकतो. आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा सचिन त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला एकाच संघाचा भाग असताना खेळाचे बारकावे स्पष्ट करताना दिसेल.
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनला मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२१ च्या लिलावात २० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते आणि तो आधीच यूएईला पोहोचला आहे. झहीर खान, ट्रेंट बोल्ट सारख्या दिग्गज गोलंदाजांकडून गोलंदाजीचे बारकावे शिकत आहे. मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याआधी अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत काही वर्षे नेट बॉलर म्हणून जोडलेला होता. तो आयपीएल २०२० मध्ये संघासह यूएईला गेला होता. त्याने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, म्हणून तो यशस्वी गोलंदाज, भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसूमने
Video: इंग्लड दौरा गाजवल्यानंतर सीएसकेचे शार्दूल, जडेजा, पुजारा पोहचले दुबईत, आता राहणार क्वारंटाईन
प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड