---Advertisement---

मुंबई- पुणे प्रवासात सचिन तेंडुलकरचा ‘आम्ही डोलकर’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 9:02 PM
Sachin-Tendulkar-Dance
---Advertisement---

सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. कोविड-१९ मुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्व साखळी फेरी सामने मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर खेळवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून या लीगचा भाग असलेले सर्व आजी-माजी दिग्गज सध्या आयपीएल सामन्यांसाठी मुंबई-पुणे-मुंबई अशा वारी करत आहेत.

दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेला सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने मुंबई ते पुणे प्रवासादरम्यानचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थायी समितीचे चेयरमन रमेश पोकाळे (Ramesh Pokale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघ त्यांचा पुढील आयपीएल सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे मुंबईचा ताफा सध्या पुण्याला रवाना झाला आहे. सचिनची आपले सहकारी किरण मोरे यांच्यासह कारमधून पुण्याला गेला आहे. मुंबई ते पुणे असा प्रवास करत असताना सचिनची कार ट्राफिकमध्ये अडकली असता त्याने वैतागून न जाता गाणे गात आणि त्यावर नाचत प्रवासाचा आनंद घेतला. यादरम्यानचा व्हिडिओ सचिनने फेसबुकवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओत दिसते की, सचिन आणि किरण मोरे ‘डोलकर दर्याचा राजा’, या मराठी गाण्यावर हाताने स्टेप करत नाचत आहेत. सचिनने हा छान असा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पुण्याला जात असताना ट्राफिकमध्ये अडकलो. दरम्यान हे गाणे ऐकण्याचा विचार डोक्यात आला. मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा… पुण्याला करतोय ये जा…’

सचिनच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अगदी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थायी समितीचे चेयरमन रमेश पोकाळे यांनीही सचिनच्या पोस्टवर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

“माणूस कितीही मोठा झाला…अगदी भारतरत्न असला तरीही तो सर्वोच्च पदाचा व श्रीमंतीचा हाव भाव अलगतपणे बाजूला ठेवून आनंदी व सकारात्मक आयुष्य कसे जगायचे हे आपल्या आवडत्या जगप्रसिद्ध असलेल्या सचिनजी तेंडुलकर यांच्याकडून शिकलेच पाहिजे.. ही खिलाडूवृत्ती आपल्या व्यक्तिमत्वात असणे आवश्यक आहे…आम्हाला आपला सदैव अभिमान वाटतो सचिनजी,” असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये लिहिले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट’ म्हणत शास्त्रींकडून ‘या’ भारतीय गोलंदाजाचे कौतुक, टी२० विश्वचषकात जाणवली कमी

RRvsRCB | नाणेफेक जिंकत फाफचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असा आहे राजस्थान आणि बेंगलोरचा संघ

‘कर्णधार रोहित सामन्यादरम्यान खेळाडूंना करतो शिवीगाळ’, इशानने मोठा खुलासा करत सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---