भारतीय संघाचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये महान फलंदाज एका गेमिंग एप्लिकेशनचा प्रचार करतना दिसला. आता हा व्हिडिओ खोटा आहे, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्वतः सचिनने आपल्या अदिकृत सोशल मीडिया खात्यावरून याबाबस सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
व्हायरल व्हिडिओत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्या गेमिंग ऍप्लिकेशनबाबत माहिती सर्वांना देत आहे. अशात या व्हिडिओबाबत माहिती मिळताच सचिनने सोमवारी (15 जानेवारी) आपल्या आपल्या सोशल मीडिया खात्यावरून सविस्तर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने या व्हिडिओचे सत्य सर्वासमोर आणले. व्हिडिओत सचिन असी माहिती देत आहे की, त्याची मुलगी ही गेम रोज खेळते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे देखील कमावते. पण या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे त्याने पोस्टमधून स्पष्ट केले. महान फलंदाजाच्या मते तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे आणि ही बाब चिंतेची आहे.
सचिनने आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावरून पोस्ट केली की, “हा व्हिडिओ खोटा आहे. तंत्रज्ञानाचा असा चुकीचा वापर अडचण वाढवणारा ठरत आहे. सर्वांना विनंती आहे की, अशा प्रकारचे व्हिडिओ, जाहिराती आणि ऍप्सवर बंदी घाला.” दरम्यान, व्हिडिओत वापरला गेलेला आवाच सचिनशी मिळता-जुळता आहे. सचिन पुढे असेही म्हणतो की, “सोशल मीडियानेही तक्रारींबाबत सतर्क आणि उत्तरदायी असले पाहिजे. चुकीच्या सुचना आणि डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित कारवाई होणे महत्वाचे आहे.”
These videos are fake. It is disturbing to see rampant misuse of technology. Request everyone to report videos, ads & apps like these in large numbers.
Social Media platforms need to be alert and responsive to complaints. Swift action from their end is crucial to stopping the… pic.twitter.com/4MwXthxSOM
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2024
दरम्यान, सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन काही वर्ष झाली आहेत. पण मास्टर ब्लास्टर अजूनही काही चॅरिटी स्पर्धा आणि सामन्यांमध्ये खेळताना दिसते. त्याने आपला शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळला होता. आता महान फलंदाज कृष्णन क्रिकेटमध्ये ‘वन वर्ल्ड वन फॅमिली कर’साठी क्रिकेट सामना खेळणार आहे. हा सामना मुड्डेनहल्ली कर्नाटकमध्ये 18 जानेवारी रोजी खेळली जाणार आहे. (Sachin Tendulkar made a detailed post about the deep fake video)
महत्वाच्या बातम्या –
Virat Kohli Records: कोहलीला विश्वविक्रम मोडण्याची संधी, अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 6 धावांची गरज
एमएस धोनी विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल, माजी व्यावसायिक भागीदारानेच केले मोठे आरोप





