IND vs AFG 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (17 जानेवारी) बेंगलोर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. कोहलीला टी20 मध्ये 12000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 6 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 375 सामने खेळले आहेत. या कालावधीत 11994 धावा केल्या आहेत. कोहलीने या फॉरमॅटमध्ये 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. तो 12000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे. कोहली 6 धावा करताच ही कामगिरी करेल. यासह तो टी-20 मध्ये सर्वात जलद 12 हजार धावा करणारा खेळाडू बनेल. कोहलीची टी-20 सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे.
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) याने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 463 सामन्यात 14562 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतके केली आहेत. गेलची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 175 आहे. या यादीत शोएब मलिक (Shoaib Malik) दुसऱ्या स्थानावर आहे. मलिकने 525 सामन्यात 12993 धावा केल्या आहेत. त्याने 82 अर्धशतके केली आहेत. शोएबची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 95 आहे. केरॉन पोलार्ड (Kieron Pollard) तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी दिली जाऊ शकते. सॅमसनला पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आता भारत आपल्या नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. (Kohli has a chance to break the world record needs only 6 runs against Afghanistan)
हेही वाचा
एमएस धोनी विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल, माजी व्यावसायिक भागीदारानेच केले मोठे आरोप
भारताचा युवा खेळाडू भेटला आपल्या आयडाॅलला; दिग्गजाच्या पायापडून घेतला आशीर्वाद, पाहा व्हिडिओ