India To Set World Record: भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज जेव्हा भारतीय संघ बेंगलोरमध्ये अफगाणिस्तानशी भिडेल तेव्हा त्यांना विश्वविक्रम रचण्याची संधी असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.
भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आता तिसरी टी-20 जिंकून रोहित ब्रिगेडला अफगाणिस्तानचा सफाया करायचा आहे. भारतीय संघाने तिसरा टी20 जिंकला तर त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होईल.
जर भारतीय संघाने आज तिसर्या टी20 मध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला तर तो टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक क्लीन स्वीप करणारा संघ बनेल. सध्या हा विश्वविक्रम भारत आणि पाकिस्तान यांच्यात संयुक्तपणे आहे. मात्र, आज भारताने विजय मिळवला तर पाकिस्तानला मागे टाकून सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर होईल. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये क्लीन स्वीप केला आहे. पाकिस्तान संघानेही 8 वेळा क्लीन स्वीप केला आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक वेळा क्लीन स्वीप करणारे संघ
भारत- 8
पाकिस्तान- 8
इंग्लंड- 4
ऑस्ट्रेलिया- 3
न्यूझीलंड- 3
दक्षिण आफ्रिका – 3
2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा टी20 सामना आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध घरच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून त्यानंतर आयपीएल 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. 2024 टी20 विश्वचषक आयपीएलनंतर लगेचच खेळवला जाईल, ज्यामध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. (Team India is just one win away from creating history beating Pakistan to set a world record today)
हेही वाचा
Virat Kohli Records: कोहलीला विश्वविक्रम मोडण्याची संधी, अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 6 धावांची गरज
एमएस धोनी विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल, माजी व्यावसायिक भागीदारानेच केले मोठे आरोप