नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १५वा हंगाम संपन्न झाला. त्यानंतर अनेक माजी खेळाडू आणि क्रिकेट विश्लेषकांनी आपल्या परिने यंदाच्या आयपीएलचा सर्वोत्तम संघ बनवला आहे. या सर्व प्रक्रियेतून भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरही दूर राहू शकला नाही. सचिनने देखील आयपीएल २०२२ साठीचा एकत्रित संघ बनवला आहे. मात्र, सचिनने त्याच्या संघात भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली सह सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या तिघांनाही स्थान दिले नाही.
सचिन तेंडूलकर (SachinTendulkar) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याला भावलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन तयार केली आहे. सचिनने या संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या याला दिले आहे. हार्दिकने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचे उत्तम नेतृत्व केले आहे. त्यामुळे आपल्या संघाचा कर्णधार हार्दिक असेल असे सचिनने सांगितले.
सचिनने त्याच्या संघात सलामीवीर म्हणून यंदा ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर सजवणाऱ्या जोस बटलर आणि पंजाब किंग्जसाठी चांगली खेळी करणाऱ्या शिखर धवनला निवडले आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल याला फलंदाज म्हणून स्थान दिले आहे. त्यांच्या नंतर फलंदाजीमध्ये डेविड मिलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. तर, यष्टीरक्षक म्हणून यंदा बंगलोरच्या संघाचा तारणहार ठरणाऱ्या दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.
संघातील फलंदाजी मजबूत केल्यानंतर सचिनने गोलंदाजी देखील बुलंद करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने संघात फिरकीपटू राशिद खान आणि युझवेंद्र चहल या दोघांना स्थान दिले आहे. तर जलद गतीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद शामी, आणि जसप्रीत बुमराह या दोघांना सामावून घेतले आहे.
असा आहे सचिनचा आयपीएल २०२२चा संघ
शिखर धवन, जॉस बटलर, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, लिएम लिव्हिंगस्टोन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), राशिद खान, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘महिला आयपीएल’चा मुहूर्त ठरला! सीएसकेची वुमन्स टीमही स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; आठपैकी दोन सामने होणार अमेरिकेत
धोनीला टीम इंडियात खेळण्याची संधी कशी मिळाली? स्वत: माहीनेच केलाय खुलासा