---Advertisement---

रजत पाटीदारने फोटो शेअर करत मानले विराट कोहलीचे आभार; म्हणाला, ”माझ्यावर विश्वास…’

On: शुक्रवार, मे 27, 2022 9:31 PM
Rajat-Patidar
---Advertisement---

बुधवारी (२५ मे) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात रजत पाटीदारच्या ताबडतोड खेळीमुळे आरसीबीला विजय मिळाला. त्याने या सामन्यात शतक ठोकले आणि संघाची धावसंख्या २०७ पर्यंत नेली. सामना जिंकल्यानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही पाटीदारचे कौतुक केले होते. अशात आता पाटीदारने स्वतःच्या ट्विटर खात्यावरून त्याला संघात सहभागी केल्याबद्धल विराटचे आभार मानले आहे.

रजत पाटीदार (Rajat Patidar) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात जबरदस्त खेळला. त्याने ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी पाटीदारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. विराट कोहलीकडून (Virat Kohli) कौतुक ऐकल्यानंतर त्याने स्वतःच्या सोशल मीडियावर विराटसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये त्याचे आभार मानले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “विराट माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद.”

https://twitter.com/RajatPatidarOff/status/1529685477955018752?s=20&t=-_Qtb_enC9sl1-xkxUt1Kg

दरम्यान, एलिमिनेटर सामना जिंकल्यानंतर आरसीबीने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान पक्के केले. हा सामना संपल्यानंतर विराटने पाटीदारचे कौतुक करताना म्हटले की, “सामना संपल्यानंतर मी पाटीदारला म्हटलो, एवढ्या वर्षात मी अनेक प्रभावित करणाऱ्या इनिंग पाहिल्या आणि दबावाद खेळल्या गेलेल्या इनिंग्ज पाहिल्या, पण त्याच्यापेक्षा चांगल्या इनिंग जास्त नाही पाहिल्या. मोठ्या आणि दबावाच्या सामन्यात एका अनकॅप्ड खेळाडूचे शतक. हा महत्वाचा सामना होता आणि मला दबाव जाणवत होता. कारण मी त्या परिस्थितीमध्ये राहिलो आहे, जिथे तुम्हाला संघाच्या रूपात एक सीमा पार करायची असते. पाटीदारने जे केले ते खास होते. मला नाही वाटत हे हलक्यात घेतले पाहिजे.”

दरम्यान, पाटीदारला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात एकाही संघाने खरेदी केले नव्हते. पण लीगच्या मध्यात लवनीत सिसोदिया दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाला. सिसोदियाचा बदली खेळाडू म्हणून आरसीबीने पाटीदारला २० लाख रुपये बेस प्राईसमध्ये खरेदी केले. आता त्याने मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलल्याचे पाहायला मिळत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अर्जुन तेंडूलकरमध्ये प्रतिभा असूनही तो कायम डगआऊटमध्ये का असतो?

काय आहे राजस्थानविरुद्धचा मास्टरप्लॅन? वाचा काय म्हणाला आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस

बाप तर बाप‌, बेटा ही खेळला टीम इंडियासाठी; पाहा क्रिकेटर पिता-पुत्रांच्या जोड्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---