नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताला घवघवीत यश मिळाले होते. भारतीय खेळाडूंनी पदक जिंकून भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. मीराबाई चानूनी वेट लिफ्टींग या क्रीडा प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. ज्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील मीराबाई चानूची भेट घेतली आहे.
मीराबाई चानूनी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी पदक मिळवून दिले होते. तिनी ४९ किलोग्रॅम वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले होते. या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. भारतात परतल्यानंतर मीराबाई चानूनी देखील त्या ट्रक ड्रायव्हर्सचा सन्मान केला होता, ज्यांनी तिला सुरुवातीच्या काळात सरावाच्या ठिकाणी पोहचवण्यात मदत केली होती. या गोष्टीमुळे देखील सोशल मीडियावर तिचे कौतुक केले जात आहे.(Sachin Tendulkar meets tokyo Olympics silver medalist Mirabai chanu says it was wonderful talking to you)
सचिन तेंडुलकर यांनी देखील घेतली मीराबाई चानूची भेट
तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील मीराबाई चानूची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले होते. मीराबाई चानूनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “सचिन तेंडुलकर सर यांना भेटून खूप बरे वाटले. त्यांचे ज्ञान आणि प्रेरणादायी शब्द नेहमीच माझ्यासोबत राहतील. खरचं खूप प्रेरणादायी होतं.”
Loved meeting @sachin_rt Sir this morning! His words of wisdom & motivation shall always stay with me. Really inspired. pic.twitter.com/Ilidma4geY
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) August 11, 2021
तसेच सचिन तेंडुलकर यांनी देखील मीराबाई चानूच्या ट्विटला प्रतिसाद देत लिहिले की, “मीराबाई चानु तुम्हाला भेटून देखील मला आनंद झाला. मणिपूर पासून ते टोकियो पर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमच्यासोबत चर्चा करून बरे वाटले. येणाऱ्या काही वर्षात तुम्हाला आणखी पुढे जायचं आहे. अशीच मेहनत करत रहा.”
Equally happy to meet you this morning, @mirabai_chanu! 🙂
It was wonderful talking to you about your inspiring journey from Manipur to Tokyo.
You've got places to go in the coming years, keep working hard. https://t.co/YH4ta0cVY0
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 11, 2021
मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे ऑलिंपिक पदक मिळवून दिले आहे. यापूर्वी कर्नम मल्लेश्वरीने २००० साली झालेल्या सिडनी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंद तर होणारच!! दिल्लीचा ‘हा’ धाकड खेळाडू झाला पूर्णपणे फिट, लवकरच युएईला होणार रवाना
शाकीबने दोन दिवसांपूर्वी टी-२०मध्ये केला मोठा कारनामा, आता ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी
“खेळाडूंच्या मेहनतीवर टीका करू नये,” कर्णधार जो रुटचा आपल्या खेळाडूंना पाठिंबा