भारताचा दिग्गज सलामीवीर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून चाहत्यांना ही बातमी दिली. धवन सर्वप्रथम 2004 अंडर 19 विश्वचषकातील शानदार कामगिरीनंतर चर्चेत आला होता. त्यानं 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलं. 2022 मध्ये तो भारतासाठी शेवटचा सामना खेळला.
शिखर धवननं निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासाठी शुभेच्छांचा पूर आला आहे. भारतीय संघातील क्रिकेटपटूंसह अनेक माजी खेळाडूंनी त्याला त्याच्या नव्या इनिंगसाठी ऑल द बेस्ट म्हटलंय. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणऱ्या सचिन तेंडुलकरनं देखील सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून धवनला शुभेच्छा दिल्या. सचिननं धवनचा 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एक फोटो शेअर केला आहे.
सचिननं लिहिलं, ” शिखर धवन! क्रिकेटचं मैदान नक्कीच तुला आठवणीत ठेवेल. तुझं हास्य, तुझी शैली आणि खेळाप्रती तुझं प्रेम नेहमीच आठवणीत राहणार. जसं तू आपल्या क्रिकेट कारकीर्दीचं पान उलटत आहेस, तसा तुझा वारसा चाहते आणि साथिदारांच्या मनात नेहमीच कायम राहणार. तुला आगामी काळासाठी शुभेच्छा. असाच नेहमी हसत राहा!”
The cricket field will surely miss your flamboyance, @SDhawan25. Your smile, your style, and your love for the game have always been infectious. As you turn the page on your cricketing career, know that your legacy is forever etched in the hearts of fans and teammates alike.… pic.twitter.com/TR3TvbAj8w
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 24, 2024
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, शिखर धवन आणि सचिन तेंडुलकर एकत्र सलामीला आले आहेत. आयपीएल 2010 मध्ये धवन मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. तेव्हा तो सचिन सोबत ओपनिंग करायचा. त्या हंगामात मुंबईनं फायनलपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र फायनलमध्ये संघाला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्कारावा लागला.
सचिन आणि शिखर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एकत्र खेळले आहेत. धवनला सचिनकडूनच कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली होती. सचिनच्या शेवटच्या कसोटीत देखील धवन भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होता.
हेही वाचा –
जो रूटने मोडला राहुल द्रविड-ॲलन बॉर्डरचा मोठा विक्रम, लवकरच रचणार इतिहास
पाकिस्तानची शरणागती; बांग्लादेशचा सामन्यावर मजबूत पकड, विजयाच्या अगदी जवळ
“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज