---Advertisement---

“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सध्या धरमशालामध्ये खेळला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसननं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.

अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. त्यानं कुलदीप यादवची विकेट घेताच हा विक्रम आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा अँडरसन कसोटी इतिहासातील केवळ तिसरा गोलंदाज बनला आहे. अँडरसननं 187 कसोटी सामन्यात 700 बळी घेण्याचा पराक्रम केला.

जेम्स अँडरसनच्या या कारनाम्यानंतर आता त्याच्यावर चोहूकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याचं अभिनंदन केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून अँडरसनचं अभिनंदन केलं. सचिननं त्याच्या या कामगिरीला अद्भुत म्हटलंय.

“2002 मध्ये मी अँडरसनला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिलं होतं. तेव्हा त्याचं चेंडूवरचे नियंत्रण विशेष दिसत होतं. त्यावेळेस नासेर हुसेन त्याच्याबद्दल खूप चांगलं बोलायचे. आज मला खात्री आहे की ते (नासेर हुसेन) म्हणत असतील की, ‘मी हे आधीच बोललो होतो.’ 700 कसोटी बळी ही एक उत्कृष्ट कामगिरी आहे. एक वेगवान गोलंदाज 22 वर्षे खेळून 700 विकेट्स घेण्याइतकी सातत्यपूर्ण कामगिरी करतो हे प्रत्यक्षात येईपर्यंत काल्पनिकच वाटलं असतं!”, अशा शब्दांत सचिननं अँडरसनचं कौतुक केलं.

 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहेत. त्यानं 133 कसोटी सामन्यांमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नचं नाव येतं. त्यानं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. अँडरसननं आणखी 9 विकेट घेताच तो कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचेल.

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत जेम्स अँडरसन अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडचं नाव येतं. त्यानं 167 कसोटीत 604 विकेट घेतल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा असून त्याच्या नावे 124 कसोटीत 563 विकेट आहेत.

इतर बातम्या-

महाविक्रम! अँडरसन बनला 700 कसोटी विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज, लवकरच शेन वॉर्नला टाकणार मागे

शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर

धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---