मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आत्तापर्यंत फलंदाजी करताना अनेकदा मोठ्या खेळी करत विश्वविक्रम रचले आहेत. पण त्याच्या नावावर असा एक विश्वविक्रम आहे, जो त्याने गोलंदाजी करताना केला आहे.
सचिन हा भारताचा पार्टटाईम लेगस्पिनर होता. तो बऱ्याचदा सामन्यात मुख्य गोलंदाजांना विश्रांती म्हणून मधली षटके टाकायचा. असे असले तरी त्याने अनेकदा गोलंदाजी करताना महत्त्वाची भूमिकाही निभावली आहे. त्याने वनडे सामन्यातील शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना दोन वेळा 6 किंवा त्यापेक्षा कमी धावांचे रक्षण केले आहे.
त्यामुळे वनडेमध्ये शेवटच्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला 6 किंवा त्यापेक्षा कमी धावांची विजयासाठी गरत असतानाही गोलंदाजी करताना त्या धावांचे दोन वेळा रक्षण करणारा सचिन जगातील एकमेव खेळाडू आहे.
त्याने असा कारनामा पहिल्यांदा हिरो कपच्या उपांत्य सामन्यात 24 नोव्हेंबर 1993 ला केला होता. त्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात केवळ 6 धावांची आवश्यकता होती. तर भारताला 2 विकेट्सची गरज होती.
त्यावेळीचा भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या हातातून तेव्हा सचिनने चेंडू घेतला आणि ते शेवटचे षटक टाकण्याची तयारी दाखवली. त्यावेळी पहिल्या चेंडूवर ब्रायन मॅकमिलनने पाँइंटच्या दिशेला फटका मारला. त्या चेंडूवर पहिली धाव मॅकमिलन आणि फॅनी डी विलियर्सने पूर्ण केली पण दुसरी धाव घेण्याच्या नादात डी विलियर्स धावबाद झाला.
त्यानंतर 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऍलेन बॉर्डर यांनी 2 चेंडू खेळले पण त्यांना एकही धाव करता आली नाही. चौथ्या चेंडूवर त्यांनी 1 धाव काढली. सचिनने टाकलेला 5 वा चेंडूवर एकही धाव निघाली नाही. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला चार धावांची गरज होती. पण त्यांना एकच धाव काढता आली आणि भारत हा सामना 2 धावांनी जिंकला.
त्यानंतर 3 वर्षांनी 3 नोव्हेंबर 1996 ला झालेल्या टायटन कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिनने असे दुसऱ्यांदा केले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती आणि भारताला विजयासाठी 1 विकेटची आवश्यकता होती.
त्यावेळी सचिननेच शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी घेतली. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ब्रॅड हॉग धाव बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला.
ट्रेंडिंग घडामोडी –
३ कोटी रुपये कोरोनाविरुद्ध लढाईत देणाऱ्या कोहलीची प्राॅपर्टी ऐकून व्हाल अवाक्
डेविड वाॅर्नरने या कारणामुळे केला टक्कल, चाहत्यांनी केले कौतूक
लाॅकडाऊनमध्येही या खेळाडूंना जायचं आहे घराबाहेर, हे आहे कारण