---Advertisement---

World Photography Day: सचिन तेंडुलकरने शेअर केला उडणाऱ्या कारचा फोटो

---Advertisement---

मुंबई । जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडियावर एक मनोरंजक फोटो पोस्ट केला आहे, ते पाहून सर्वजण चकित झाले आहे. या फोटोत एक कार हवेत दिसत आहे, तेथे बरेच लोक जमिनीवर उभे आहेत आणि एक कार देखील आहे. हे चित्र पोस्ट करत सचिन तेंडुलकरने कॅप्शन लिहिले की, “या फोटोत काय घडले आहे ते मला सांगा.” सचिन तेंडुलकरने अनिल कुंबळे याच्याकडून या प्रश्नचे उत्तर मागितले आहे. जो की एक उत्तम छायाचित्रकार आहे.

सचिन तेंडुलकरने पोस्ट केलेला फोटो अनेक चाहत्यांना आश्चर्यचकित करते, परंतु काही लोकांनी या चित्रातील रहस्यही उघड केले. वास्तविक हा फोटो उलट्या बाजूने पोस्ट केला गेला आहे. या फोटोत कार हवेत उडत नाही, उलट ती पाण्यात बुडालेली आहे आणि जमिनीवर उभे असलेल्या लोकांची प्रतिमा पाण्यात दिसत आहे.

https://twitter.com/abhijeetanand07/status/1296023371075919879

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनेही सचिनच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. विनोद कांबळी याने लिहिले की, “अखेर 2020 मध्ये उडत्या कारही दिसू लागल्या.”

https://twitter.com/vinodkambli349/status/1296041351134420992

सचिन तेंडुलकरला हवी आहे मारुती 800 कार

नुकतेच सचिन दुसर्‍या एका कारणामुळे चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरने ‘स्पोर्टलाइट’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे की, त्याला त्याची जुनी मारुती 800 कार परत घ्यायची आहे. सचिनकडे फेरारी, जीटी-आर आणि बीएमडब्ल्यूसारख्या जागतिक दर्जाच्या महागड्या कार आहेत. पण तो मारुती 800 ही त्याची पहिली कार विसरला नाही. सचिन तेंडुलकर याने आवाहन केले आहे की ज्याने कोणी मारुती 800 कार विकत घेतली असेल आहे, त्याने त्याच्याशी संपर्क साधावा. या कारच्या अनेक आठवणी असल्याने त्या जपण्याकरिता सचिन तेंडुलकरला ती कार परत हवी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---