---Advertisement---

‘चांगला खेळला पण तू माझा विक्रम…’, वनडेत बरोबरी करणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट

Sachin Virat Harbhagan
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने रविवारी (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध वनडे कारकिर्दीतील 49वे शतक केले. सोबतच सचिन तेंडुलकर याची वनडे शतकांच्या बाबतीत बोरबरी देखील केले. सचिनच्या विक्रमाची बरोबरी करणारा विराट पहिलाच फलंदाज असल्यामुळे याला अधिक महत्व आहे. रविवारी त्याची खेळी पाहिल्यानंतर स्वतः सचिनने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास पोस्ट केली.

सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 100 शतके केली आहेत. सचिनचा हा विक्रम मोडणे काही वर्षांपूर्वी कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य होते. मात्र, मागच्या काही वर्षांपासून विराट हा विक्रम मोडणार, असे अनेकदा बोलले जाते. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 49 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके केली आहेत. दुसरीकडे विराटने वनडेत 49 तर कसोटीत 29, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक करू शकला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत 79 शतकांसह विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विश्वचषक 2023 सुरू असताना सचिनकडून त्याचा स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी विराटला शुभेच्छा मिळाल्या आहेत. सचिनला आपले 100 वे आंतरराष्ट्रीय शतक करण्याआधी चांगलाच संघर्ष करावा लागला होता. जवळपास एक वर्ष तो या शतकासाठी झगडत होता. पण विराटला वनडे क्रिकेटमधील 50 वे शतक पुढच्या काहीच दिवसात करताय यावे, अशा शुभेच्छा त्याने सोशल मीडिय पोस्टमधून दिल्या आहेत. सचिनने या पोस्टमध्ये लिहिले की, “चांगला खेळलास विराट. मला 49 वरून 50 व्या शतकापर्यंत पोहोचण्यासाठी 365 दिवस लागले होते. पण आशा आहे तू 49 ते 50व्या शतकापर्यंतचा प्रवास येत्या काही दिवसांमध्ये पार करशील आणि माझा विक्रमही मोडशील.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला होता. 50 षटकांच्या सामन्यात 5 विकेट्सच्या नुकसनावर भारताला 326 धावांपर्यंत मजल मारता आली. यात विराट कोहली याचे शतक, तर श्रेयस अय्यर (77) याचे अर्धशतक महत्वाचे ठरले.  (Sachin Tendulkar posted a special post for Virat Kohli who equaled him in ODI centuries)

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी

महत्वाच्या बातम्या – 
जडेजाने पार पाडली फिनिशरची भूमिका, विराटच्या शतकामुळे भारताची 326 धावांपर्यंत मजल
विराटने केली वाढदिवशी शतक ठोकण्याची डेरिंग, बनला जगातील फक्त सातवाच धुरंदर, यादीत आणखी 2 भारतीयही सामील

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---