---Advertisement---

हरलीन देओलच्या झेलाचा ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिनही झाला फॅन; ‘या’ शब्दात केले कौतुक

On: रविवार, जुलै 11, 2021 2:43 AM
---Advertisement---

इंग्लंड महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ पराभूत झाला असला तरीही हरलीन देओलने टिपलेला एक झेल दिवसभर चर्चेचा विषय बनला असून, या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हरलीनच्या या झेलाचे सचिन तेंडूलकरनेदेखील ट्विट करून कौतुक केले.

हरलीनचा नेत्रदीपक झेल
डावातील १९ व्या षटकात भारतीय महिला संघाकडून हरलीन देओलने एक अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंड संघाकडून तुफान फटकेबाजी करत असलेल्या जोन्सने शिखा पांडेच्या चेंडूवर डीपमध्ये शॉट खेळला होता. सर्वांना वाटले होते की, तो चेंडू आरामात सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु हरलीन देओलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला.

हरलीनने सीमारेषेजवळ उंच उडी मारत आधी झेल टिपला त्यानंतर तिला जाणवले की, तिचा तोल जाऊन ती सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकते. त्यावेळी तिने चेंडू हवेत उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर गेली. त्यानंतर पुन्हा आत येऊन तिने सूर मारत हा अप्रतिम झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सचिनने केले कौतुक
हरलीन देओलच्या या झेलाचे सर्वजण कौतुक करत असतानाच भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने ट्विट करत या झेलाचे कौतुक केले. सचिनने लिहिले, ‘हरलीन देओल हा एक अप्रतिम झेल होता. माझ्यासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट झेल.’

https://twitter.com/sachin_rt/status/1413719913458409479

केवळ सचिनच नाही तर, व्हीव्हीएस लक्ष्मणनेही हरलीन देओलच्या झेलाचे कौतुक केले. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत घेतल्या गेलेल्या एक उत्तम झेलांपैकी एक. एकदम टॉप क्लास’

बॉलिवूडचा आघाडीचा संगीतकार विशाल डडलानी हा या झेलावर प्रतिक्रिया देणारा पहिला सेलिब्रिटी होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सापडला कोरोनिबाधित, नुकताच झाला होता वरिष्ठ संघात सामील

लॉर्ड्सवर हसन अलीचा ‘मोठा’ कारनामा, पाच बळींसह केली ‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी

इंग्लंडने पाकिस्तानला पुन्हा एकदा पाजले पराभवाचे पाणी, सोप्या विजयासह मालिका घातली खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---