---Advertisement---

VIDEO: पुण्यातल्या त्याच मैदानावरून सचिनने जागवल्या ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणी; ऐका काय होता किस्सा

---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून भारताच्या सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत धावांचा अक्षरशः डोंगर रचला. त्याच्याच नावे फलंदाजीतील अनेक विक्रम जमा आहेत. सचिन अगदी शालेय वयापासून क्रिकेटमध्ये नाव कमावत होता. आता त्याच जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ सचिनने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केला आहे.

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो ३५ वर्षांपूर्वीची आठवण सांगताना दिसतोय. सचिन म्हणाला,

https://twitter.com/sachin_rt/status/1559847874560569345?t=2d9DmQJ3yJDt1agA2V-s2w&s=19

“मी आत्ता पुण्यातील पीवायसी जिमखाना मैदानावर उभा आहे. या मैदानाशी माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत. मुंबईच्या अंडर-१५ संघासाठी मी इथूनच खेळायला सुरुवात केली होती. १९८६ च्या आसपास आम्ही येथे खेळायला आलो होतो. त्यावेळी माझा सहकारी असलेल्या राहुल गणपुले याने एक फटका खेळत तिसऱ्या धावेसाठी मला बोलावले. तो माझ्यापेक्षा जवळपास अडीच वर्षांनी मोठा होता. तो वेगात धावत असल्याने त्याने तिसरी धाव पूर्ण केली. मात्र मी धावबाद झालो. त्यानंतर मी ग्राउंड ते पवेलियनपर्यंत अक्षरशः रडत पोहोचलो. ड्रेसिंग रूममध्ये वासू परांजपे ,मिलिंद रेगे यांच्यासारख्या आमच्या प्रशिक्षकांनी मला आणखी पुढे संधी मिळेल असे म्हणत, समजावले. आज त्या सर्व आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.”

सचिन तेंडुलकर हा शालेय क्रिकेटमध्ये शारदाश्रम शाळेसाठी खेळत असताना विनोद कांबळी याच्यासह ६६४ धावांची भागीदारी केल्यानंतर चर्चेत आला होता. पुढे त्याला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्याने १९८९ ते २०१३ या काळात भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत जगातील सर्वात यशस्वी फलंदाज होण्याचा मान मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---