---Advertisement---

VIDEO: सचिनने पुन्हा दाखवला ‘मास्टर क्लास!’ अँटिनीविरुद्ध खेळलेला नेत्रदीपक शॉट एकदा बघाच

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 4:00 PM
Sachin-Tendulkar-Shot
---Advertisement---

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (RSWS) सुरू झाली आहे, ज्यातील पहिला सामना भारत लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात खेळला गेला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा खेळताना पाहण्याची संधी मिळणार असल्याने या सामन्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सचिननेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही आणि असे काही नेत्रदीपक शॉट्स पाहिल्यानंतर चाहते जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले.

मखाया अँटिनीच्या षटकात सचिनने लाँग ऑनच्या दिशेने एक उंच शॉट खेळला, ज्यावर त्याला चार धावा मिळाल्या. सचिनने खेळलेला हा शॉट प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन गेला आणि संपूर्ण स्टेडियम या शॉटच्या कौतुकाने जल्लोष करू लागला. मात्र, सचिनला फार मोठी खेळी खेळता आली नाही आणि अँटनीविरुद्ध तो बाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शानदार शतकासह गांगुली, लाराचा विक्रम उध्वस्त; स्टिव्ह स्मिथची बड्या विक्रमात आगेकूच
शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या फिंचवर साउदीने नाही दाखवली दया, पाहा कसा उडवला त्रिफळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---