---Advertisement---

बरोबर ७ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय

On: सोमवार, मार्च 18, 2019 5:31 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने १८ मार्च २०१२ रोजी वनडे क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला. हा सामना सचिन पाकिस्तान संघाविरुद्ध ढाक्याच्या शेर ए बांगला स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळला.

हा सामना सचिनच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल असे तेव्हा कुणालाही वाटले नव्हते. कारण सचिनने यानंतर २३ डिसेंबर २०१२ रोजी वनडेतील निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर बरोबर १ वर्षांनी सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्त झाला.

भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सामना ३२९ धावांचा पाठलाग करताना ६ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात सचिनने ४८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. तर सामनावीर
ठरलेल्या विराट कोहलीने १४८ चेंडूत १८३ धावा केल्या होत्या.

आशिया कप २०१२ची अंतिम फेरी गाठण्यात मात्र भारताला यावेळी अपय़श आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment