सचिन तेंडुलकर 24 फेब्रुवारी 2010 साली जगातील पहिला फलंदाज ठरला, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. ग्वालियरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर त्याने ही कामगिरी केली. त्यावेळी त्या मैदानाचे पिच क्यूरेटर समंदर सिंग चौहान होते. सचिनने ज्या चेंडूने हा विक्रम केला होता, तो चेंडू चौहान यांना सांभाळून ठेवला होता. त्यांना आता हाच चेंडू सचिनला भेट म्हणून दिला आहे.
सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज खेळली जात आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या मालिकेतील एका सामन्यासाठी काही दिवस इंदोरमध्ये होता. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या लीगमध्ये जगभरातील माजी दिग्गज खेळाडू खेळत आहेत. सचिन तेंडुलकर इंडिया लिजेंड्स संघाचे नेतृत्व करत आहे. चौहानने सांगितले की इंडिया लिजेंड्स आणि न्यूझीलंड लिजेंड्स यांच्यात आयोजित सोमवारच्या (19 सप्टेंबर) सामन्यात पावसाने बाधा आणली. त्यानंतर सचिनने स्वतः पिच क्यूरेटर समंदर सिंग चौहान यांना ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते आणि एक खास भेट देखील दिली. सचिनकडून त्यांना शूज आणि स्वाक्षरी केलेला टी-शर्ट देखील भेट मिळाला. परंतु त्याआधी समंदर यांनाही सचिनला खास भेट दिली होती.
सचिन सोमवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या आधी सरावासाठी रविवारी इंदोरच्या होळकर स्टेडियवर पोहोचला होता. तेव्हाच चौहान यांनी सचिनकडे स्वक्षरीसाठी एक चेंडू आणला. हा तोच चेंडू होता, जो सचिनच्या पहिल्या एकदिवसीय द्विशतकात वापरला गेला होता. सचिन स्वतः देखील हा चेंडू पाहून आनंदी झाला. चौहान यांनी या प्रसंगाविषयी माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, “हा चेंडू पाहताच आनंदी झालेल्या सचिनने मला विचारले की, तुम्हा हा चेंडू मला भेट म्हणून देऊ शकता का? मी देखील लगेच सहमती दर्शवली. कारण ही माझ्यासाठी आनंदाजी बाब होती.” त्याने सांगितले की, ग्वालियरमध्ये 12 वर्षांपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना संपल्यानंतर सचिनच्या त्या द्विशतकाचा चेंडू त्यांनी जपून ठेवला होता. चौहान यांच्याकडे स्टेडियमची खेळपट्टी तयार करण्याचा 40 वर्षांचा अनुभव असून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील त्या सामन्याची खेळपट्टी देखील त्यांनीच तयार केली होती. सचिनने या सामन्यात 147 चेंडूत 25 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 200 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेट बदलणार! 1 ऑक्टोबरपासून या नव्या नियमांत रंगणार ‘रनसंग्राम’; वाचा सविस्तर
INDvAUS: पहिल्याच टी20 सामन्यात लागणार रेकॉर्ड्सची रांग! विराटकडे कॅप्टन रोहितला मागे टाकण्याची संधी
INDvsAUS | ‘हा’ फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ठरेल ‘एक्स-फॅक्टर’, माहेला जयवर्धनेची मोठी प्रतिक्रिया