तब्बल २४ वर्षां भारतीय क्रिकेटवरच नाही तर जगातील क्रिकेटवर राज्य करणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक छायाचित्र शेअर करून सांगितले की कोणती गोष्ट कधीच जमली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ४ वर्षांपूर्वी निवृत्ती घेऊनही फलंदाजीच्या क्षेत्रात अनेक विक्रम ज्याच्या नावे आहे असा क्रिकेटचा देवता म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. सचिन अजूनही कसोटी आणि वनडे दोन्ही क्रिकेटच्या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटीत ५१ आणि एकदिवसीय सामन्यांत ४९ शतके असे मिळून संपूर्ण आंतराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके केली आहेत. तसेच त्याच्या नावावर अनेक फलंदाजीच्या विक्रमाची नोंद आहे.
खेळाच्या सर्व क्षेत्रात जरी सचिन अव्व्ल असला तरी असे एक क्षेत्र आहे ज्यात त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याबद्दलचा खुलासा त्याने आपल्या ट्विटर अकॉउंटवर त्याचाच एक लहानपणीच फोटो शेयर करून केला आहे. या फोटोमध्ये तो एक पुस्तक वाचत आहे.
या फोटोखाली सचिन लिहतो, “या क्षेत्रात मी कधीच चांगली कामगिरी करू शकलो नाही.”
I never was a good scorer in this field 😉 #ThrowbackThursday pic.twitter.com/fYkWqf6OQl
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 7, 2017
सचिनने १६ वर्ष २०५ दिवसांचा असताना आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. लहानपणापासूनच सचिन क्रिकेटमध्ये रमायचा. ज्या वयात बाकी मुले १०वी ची परीक्षा देतात त्या वयात सचिन वेगवान गोलंदाजांचा सामना करत होता.