आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेला प्रत्येकजण आपल्या गुरुंचं स्मरण करतो. यानिमित्त ‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं देखील आपले गुरू रमाकांत आचरेकर यांची आठवण काढली आहे. सचिननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रमाकांत सरांचं आभार मानलं.
सचिन तेंडुलकरनं पोस्टमध्ये लिहिलं, “गुरुपौर्णिमा हा तो दिवस आहे, ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंचं आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याबद्दल आभार मानतो. आज मी आचरेकर सरांची आठवण काढून त्यांनी माझ्या आयुष्यात केलेल्या बदलांबद्दल त्यांचं आभार मानतो.”
सचिननं पुढे लिहिलं, “आचरेकर सरांना त्यांच्या क्रिकेटमधील योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता. त्यांचं खेळ आणि खेळाडूंप्रती असलेलं समर्पण अतुलनीय होतं. त्यांच्याप्रमाणेच अनेक प्रशिक्षक भारतातील खेळाच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करत आहेत.”
यावेळी सचिननं ऑलिम्पिक खेळाच्या प्रशिक्षकांचंही आभार मानलं. सचिन म्हणाला, “ऑलिम्पिक खेळ जवळ येत आहेत. मी ऑलिम्पिक खेळातील सर्व प्रशिक्षकांचं त्यांचं समर्पण आणि प्रेरणेबद्दल आभार मानू इच्छितो. तुमच्या योगदानाबद्दल राष्ट्र मनापासून आभारी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्व प्रशिक्षक आणि खेळाडूंना माझ्या शुभेच्छा.”
गुरुपौर्णिमेनिमित्त विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी, विराट जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या अकादमीत पोहचला, त्यावेळेसची आठवण शेअर केली आहे. राजकुमार शर्मा यांनी सांगितलं, “विराट वडील आणि मोठ्या भावासोबत आला होता. आमच्या अकादमीचाही हा पहिलाच दिवस होता. मला तो दिवस अजूनही आठवतो. 30 मे 1998 चा तो दिवस होता. विराट असा मुलगा होता, ज्याला सर्वकाही करायचं होतं. त्याला गोलंदाजी करायची होती आणि त्याला क्षेत्ररक्षणाचीही आवड होती, जी त्याच्या वयाच्या मुलांकडे नसते.”
राजकुमार शर्मा पुढे म्हणाले की, “विराट बाऊंड्री लाईनवरूनही खूप वेगानं बॉल फेकायचा. तो बाकीच्यांपेक्षा वेगळा होता, पण त्याला बॅटिंगची खूप आवड होती. जेव्हाही तो नेटमध्ये जायचा, तेव्हा त्याला परत यायचं नाव घ्यायचा नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे किती खेळाडू भाग घेत आहेत? कोणत्या राज्यातील खेळाडूंची संख्या सर्वाधिक?
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?