मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यापूर्वी दोन महान भारतीय क्रिकेटपटू, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची भेट झाली. सामन्यापूर्वी हे दोन्ही खेळाडू वानखेडे स्टेडियमवर भेटले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. तर सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक आहे. मात्र, चालू हंगामामध्ये या दोन्ही संघांची अवस्था वाईट आहे. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स 10 व्या तर दिल्ली कॅपिटल्स 9 व्या स्थानावर आहे. या हंगामात मुंबईला अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. तर दिल्लीनं चार सामन्यांत फक्त एकच विजय नोंदवलाय.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सचिन तेंडुलकरसोबतच्या भेटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ‘शोले’ या सुपरहिट चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘तेरे जैसा यार कहां’ पार्श्वभूमीत वाजत आहे. सौरव गांगुली नेटजवळ उभा असलेल्या सचिन तेंडुलकरला भेटायला येतो, असं व्हिडिओमध्ये दिसतंय.
गांगुली काही बोलतो, पण त्याआधी सचिन तेंडुलकर हात हलवतो आणि मग गांगुलीला मिठी मारतो. दोघेही कोणत्यातरी विषयावर बोलताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना सौरव गांगुलीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “काय खेळाडू आहे! जिवलग मित्रा, तुला पुन्हा पाहून खूप छान वाटलं.”
View this post on Instagram
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली वनडे क्रिकेटमध्ये दीर्घकाळ एकत्र सलामीला उतरले आहेत. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्रीही आहे. शिवाय दोघांनी भागीदारीत अनेक विक्रम केले आहेत. सचिन आणि सौरव हे भारताचे महान क्रिकेटपटू मानले जातात. सौरव गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्षही राहिला आहे. त्याच्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरनं सीएसीमध्ये भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
देशासाठी खेळताना हिरो, आयपीएलमध्ये मात्र झिरो! ग्लेन मॅक्सवेलला झालंय तरी काय?
मुंबईविरुद्ध दिल्लीनं टॉस जिंकला, सूर्याचं पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11
राजस्थाननं आरसीबीविरुद्धच्या सामन्यात वेगळी जर्सी का घातली? जाणून घ्या कारण