---Advertisement---

सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलआधी खास सल्ला….!

On: शुक्रवार, मार्च 6, 2020 1:14 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाने पहील्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिममध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांचे कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा भारतीय महिला क्रिकेट संघाला एक संदेश पाठवलेला आहे. 

या विश्वचषकात रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी खेळणार आहे. भारतीय संघाने याआधी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीतला इंग्लंड विरूध्दचा सामना पावसामुळे वाया गेला. पण साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांक मिळवल्यामुळे भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

भारतीय संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश झाल्यानंतर सचिन मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय संघाला खास सल्ला देताना म्हणाला की ‘आत्तापर्यंत ज्या पध्दतीने खेळलात तसेच खेळत राहा आणि सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करा. योगायोग म्हणजे, मी ट्रॉफी बरोबर असताना महिला संघाच्या काही सदस्य तिथेच होत्या;  मी त्यांना सांगितलं की मला तुम्हाला भारतात ही ट्रॉफी घेऊन येताना बघायला आवडेल.’

सचिन असंही बोलला की, ‘कोणत्याही दबावाखाली न येता सर्वश्रेष्ठ खेळ सादर करा. हे बोलणं सोपं असलं तरी मी सांगेन की एकजुटीने खेळा; यश तुमचेच आहे.’

महत्त्वाच्या बातम्या- 

खेडेगावातील सुपरस्टार – सुनिल जोशी

४९ वर्षांपूर्वी या दिग्गजाने केले होते भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण

आयपीएलदरम्यान कोरोनावायरसपासून वाचण्यासाठी न्यूझीलंड आपल्या खेळाडूंची घेणार अशी काळजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---