---Advertisement---

“तुझी 22 वर्षांची कारकीर्द…”, जेम्स अँडरसनसाठी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट

On: शुक्रवार, जुलै 12, 2024 6:44 PM
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. इंग्लिश संघानं लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा 1 डाव आणि 114 धावांनी पराभव करून आपल्या स्टार गोलंदाजाला शानदार निरोप दिला.

जेम्स अँडरसन हा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या अखेरच्या कसोटीनंतर जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू त्याला शुभेच्छा देत आहेत. ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं देखील जेम्स अँडरसनसाठी एक खास संदेश पाठवला आहे.

सचिन तेंडुलकरनं त्याच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून जेम्स अँडरसनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. सचिननं अँडरसनबद्दल लिहिलं की, ‘हे जिमी, तू तुझ्या 22 वर्षांच्या कारकीर्दीनं चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंस. तुला निरोप देताना माझी एक छोटीशी इच्छा आहे. तुला वेग, अचूकता, स्विंग आणि तंदुरुस्तीनं गोलंदाजी करताना पाहणं माझ्यासाठी आनंददायी होतं. मी तुला चांगल्या आरोग्यासाठी आणि तुझ्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी शुभेच्छा देतो”.

 

विशेष म्हणजे, जेम्स अँडरसन देखील सचिन तेंडुलकरचा खूप आदर करतो. त्यानं त्याच्या शेवटच्या कसोटीपूर्वी सांगितलं होतं की, सचिनविरुद्ध गोलंदाजी करणं त्याला खूप कठीण वाटायचं. एका मुलाखतीदरम्यान अँडरसनला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं नेहमीच आव्हानात्मक जायचं? तेव्हा इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजानं क्षणाचाही वेळ न घालवता सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं.

अँडरसन म्हणाला होता, “माझ्या मते सचिन तेंडुलकर माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. मला आठवत नाही की त्याच्या विरुद्ध मी कोणतीही विशिष्ट योजना आखू शकलो. तो मैदानावर आला तेव्हा मला वाटायचं की मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट चेंडू टाकू शकत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या –

असा गोलंदाज पुन्हा होणे नाही! जेम्स अँडरसनचे क्रिकेटमधील असे रेकॉर्ड, जे कोणालाही मोडता येणे अशक्य
कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत! जेम्स अँडरसननं विजयासह घेतला निरोप
जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---