भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्रत्येक दिवशी कित्येक लोक बेड आणि ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे आपला जीव गमावत आहेत. तसेच अनेक सेलेब्रिटी आणि क्रिकेटपटू या कठीण काळात कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना दिसून येत आहेत. अशातच माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडूलकर यानेदेखील मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणत कमतरता भासू लागली आहे. या कठीण काळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने ‘मिशन ऑक्सिजन’ नावाच्या एका संस्थेत देणगी देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली आहे. ही संस्था देणगी जमा करून देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवण्याचे काम करणार आहे.
मिशन ऑक्सिजन इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘सचिनने कोरोनाच्या या लढाईत १ कोटींचे दान दिले आहे.’
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2021
— Mission Oxygen India (@india_oxygen) April 29, 2021
काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टरला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याने योग्य उपचार घेतले होते. तो आता ठीक आहे. त्याने ठीक झाल्यानंतर चाहत्यांना एक संदेश दिला होता आणि म्हटले होते की तो प्लाझ्मा डोनेट करेल.
त्याने व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, “मला एक संदेश द्यायचा आहे, जो मला डॉक्टरांनी देण्यास सांगितला आहे. मी प्लाझ्मा केंद्राचे उद्घाटन केले आणि त्यांचा संदेश होता की, जर प्लाझ्मा योग्यवेळी दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो. मी ठीक झाल्यानंतर मी ते वैयक्तिकरित्या देईन आणि मी माझ्या डॉक्टरांशी याबद्दल बोललो आहे.”
या लढ्यात अनेक सेलिब्रेटिंगसह परदेशी क्रिकेटपटूनींदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. सुरुवातीला ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने ३८ लाखांची मदत केली होती. त्यांनतर ब्रेट ली यांनी देखील मदतीचा हात पुढे केला होता. आता सचिन देखील मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ललितने अश्विनसारखी गोलंदाजी करत घेतली अविश्वसनीय विकेट, प्रशिक्षक पाहून झाले दंग; बघा व्हिडिओ
कृणालची एक अशीही बाजू! संघ सहकाऱ्याला दिली न शोभणारी वागणूक, सर्वत्र रंगली एकच चर्चा