---Advertisement---

स्टंपवर चेंडू आदळूनही स्टोक्स नॉटआऊट; सचिन म्हणतोय, ‘नवा नियम आला पाहिजे, गोलंदाजांशी प्रामाणिक…!’

On: शुक्रवार, जानेवारी 7, 2022 5:42 PM
Sachin Tendulkar
---Advertisement---

क्रिकेटमध्ये काही न काही चमत्कार होतच असतात आणि ते चमत्कार क्रिकेटप्रेमीना आकर्षित करतात. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेतील (Ashes) चौथ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स  (Ben Stokes) याला ऑस्ट्रेलियन गोलंदाज कॅमेरून ग्रीनने बोल्ड केले. पण स्टंपवर ठेवलेले बेल्स पडले नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्याला बाद देण्यात आले नाही. जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यासाठी नवा नियम यायला हवा आणि या घटनेला ‘हिटिंग द स्टंप’ (स्टंपला चेंडू लागणे), असे म्हटले पाहिजे, असे तो म्हणाला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या पहिल्या डावात ३१व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली. आत येणारा हा चेंडू स्टोक्सने चांगलाच सोडला होता, पण चेंडू थेट ऑफ-स्टंपला स्पर्श करून मागे गेला. त्यामुळे सर्वांना वाटले की स्टोक्स पायचीत झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरले नाही.

अंपायर पॉल रायफलनेही स्टोक्सला पायचीत बाद केले. मात्र यावर स्टोक्सने डीआरएस घेतला. रिव्ह्यूमध्ये जे दिसले, त्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण चेंडू त्याच्या पॅडला लागला नाही, पण ऑफ-स्टंपला स्पर्शून मागे गेला होता. तरीही स्टंपवर ठेवलेले बेल खाली पडले नाहीत आणि त्यामुळे नियमानुसार बाद देता येत नाही.

सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
सचिन तेंडुलकरने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने महान लेगस्पिनर शेन वॉर्नला टॅग करत लिहिले की, ”स्टंपला चेंडू मारणे’ हा नवा नियम लागू करावा का?, जेव्हा चेंडू स्टंपला आदळतो आणि तरीही बेल्स पडत नाहीत. तुम्हाला काय वाटते? चला गोलंदाजांशी प्रामाणिक राहू या!’ यानंतर मास्टर ब्लास्टरने तीन मजेदार इमोजी देखील शेअर केले आहेत.

सचिनच्या या ट्वीटला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. आतापर्यंत 12 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे, तर हजाराहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे.

भारताचा वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही याचा आनंद लुटला आहे. कार्तिकने हा व्हिडिओ ट्वीट करत लिहिले की, ‘जेव्हा तुमचा ऑफ स्टंपवर आणि ऑफ स्टंपचा तुमच्यावर विश्वास असतो.’

या घटनेबद्दल समालोचन करताता शेन वॉर्न आणि ऍडम गिलख्रिस्टनेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कॅरेबियन क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी बोर्डाने कसली कंबर! दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी

राहुल द्रविड घेणार रिषभ पंतची शिकवणी? वाचा काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक

भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याचा बीबीएलमध्ये धुमाकूळ, कारकिर्दीतील तिसरी हॅट्रिक घेत रचला इतिहास

व्हिडिओ पाहा – डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत 

डकवर्थ लुईस नियमाला पर्याय ठरणारी भारतीय पद्धत । What Is VJD Method Of Cricket?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---