इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिसरा ऍशेस कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे प्रदर्शन महत्वाचे असेल. कारण इंग्लंडला जिंकण्यासाठी अजून 224, तर ऑस्ट्रेलियाला 10 विकेट्स हव्या आहेत. इंग्लंड संघाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारला आहे. असात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने स्वतः इंग्लंड संघासाठी एक सल्ला दिला आहे, ज्यामुळे तिसऱ्या कसोटीत संघ विजय मिळवू शकतो.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट शेअर करत इंग्लंडला विजयासाठी सल्ला दिला आहे. सचिनच्या मते हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 9 जुलै) पहिला एक निर्णायक ठरू शकतो. सचिनने ट्वीटमध्ये लिहिले की, “हेडिंग्लेवर उद्या पहिला एक तास महत्वाचा असेल. मला वाटते खेळपट्टी चांगले काम करत आहे. अशात इंग्लंडने समजदारीने फलंदाजी केली आणि आपला दृष्टीकोण सकारात्मक ठेवला, तर ते लक्ष्य गाठू सकतात. त्यांना आपल्या शॉट सिलेक्शनमध्ये शिस्त आणण्याची गरज आहे आणि सोबत सकारात्मक दृष्टीकोणही गरजेचा आहे. असे केले, तर त्यांना लक्ष्य गाठता येईल.”
दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी सामन्याचा विचार केला, तर खेळपट्टीव गोलंदाजांसाठी अनुकूल दिसली. पहिल्या डावात इंग्लंडसाठी मार्क वुड याने 5 विकेट्स घेतल्या, तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स याने 6 विकेट्स घेतल्या. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघ 60.4 षटकात 263 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 237 धावांवर गुंडाळला गेला.
पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 26 धावांची आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावात संघ कशीबशी 224 धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लंडला शेवटच्या डावात 251 धावांचे लक्ष्य मिळाले असून अजून 224 धावांची आवश्यकात आहे. इंग्लंडने अजून एकही विकेट गमावली नाही आणि विजय त्यांच्यासाठी सोपा दिसत आहे. असे असले तरी, ऑस्ट्रेलियन गोलंदाज देखील यजमान संघाला सहजासहजी विजय मिळवू देणार नाहीत. इंग्लंडने जर सलग दिसरा पराभव स्वीकारला, तर ऍशेस 2023 ट्रॉफीही त्यांच्या हातून जाईल. असात सचिनने दिलेला सल्ला इंग्लिश खेळाडूंसाठी महत्वाचा ठरू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतचे ग्राउंडवर कमबॅक! खास सामन्यासाठी हार्दिक पंड्यासोबत लावली हजेरी
ट्रेविस हेडची महत्वपूर्ण खेळी! ऍशेसमध्ये आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंडला 251 धावांचे लक्ष्य