लंडन। इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे.
ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशासक किंवा खेळ क्षेत्रात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.
ही घंटा लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमधील बॉलर्स बारच्या (Bowlers’ Bar) शेजारी आहे. ही प्रथा 2007 पासून सुरु झाली आहे. तसेच कसोटी सामन्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मान्यवरांना ही घंटा वाजवण्याचा मान दिला जातो.
त्यामुळे आजपासून (9 आॅगस्ट) सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सुरुवात करण्याआधी ही घंटा वाजवण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देण्यात येणार आहे.
याविषयी लॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन माहिती देण्यात आली आहे. ही घंटा वाजवणारा सचिन तेंडुलकर भारताचा एकूण 7 वा खेळाडू ठरेल.
याआधी भारतीय खेळाडूंपैकी सुनील गावस्कर, नवाब पतौडी, दिलीप वेंगसरकर,राहुल द्रविड, कपिल देव आणि सौरव गांगुली यांना ही घंटा वाजवण्याचा मान मिळाला आहे.
🔔 @sachin_rt will be ringing the five-minute bell before the start of play today 🙌
📝➡️ https://t.co/a0vmQTTVMQ#LoveLords#ENGvIND pic.twitter.com/eal3Y1dAoS
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 9, 2018
ही घंटा सामन्याला सुरुवात होण्याआधी किंवा सामन्यातील दिवसाला सुरुवात होण्याआधी 5 मिनिटे वाजवली जाते त्यामुळे तिला फाइव्ह मिनिट बेल असे म्हणतात.
सचिन तेंडुलकरने इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना लॉर्ड्सवरच खेळला आहे.
सचिनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी सामन्यात 51 शतकांसह 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत, तर वनडेमध्ये 463 सामन्यात 49 शतकांच्या मदतीने 18,426 धावा केल्या आहेत.
तसेच 2014 मध्ये लॉर्ड्सच्या द्विशतकी मोहत्सवावेळी सचिनने एसीसी संघाचे नेतृत्व करताना शेन वॉर्न कर्णधार असणाऱ्या शेषविश्व संघाचा 7 विकेट्सने पराभव केला होता.
या भारतीय खेळाडूंनी वाजवली आहे लॉर्ड्सवरील घंटा-
2007 – सुनील गावस्कर, नवाब पतौडी
2011 – दिलीप वेंगसरकर
2014 – राहुल द्रविड, कपिल देव, सौरव गांगुली#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT
— Pranali Kodre (@Pranali_k18) August 9, 2018
Rahul Dravid rings the five-minute bell at the Lord's #Legend #EngvInd pic.twitter.com/9mIq1NTirn
— BCCI (@BCCI) July 17, 2014
Kapil Dev rings the five-minute bell at the Lord's #Legend #EngvInd pic.twitter.com/k1LD2qt4iN
— BCCI (@BCCI) July 20, 2014
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष
–एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना
–अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण