महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात आज (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिवस साजरा केला जात आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी आपण हा गौरव दिन साजरा करत असतो. आजवर अनेक मराठी भाषिकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जगभरात विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आजपर्यंत अनेक मराठी क्रिकेटपटू भारतीय संघासाठी खेळले आहेत. यातील लोकप्रिय नाव म्हणजे सचिन तेंडुलकर.
मुंबईतील ‘साहित्य सहवास’ सोसायटीमध्ये लहानाचा मोठा झालेल्या सचिननेही आज मराठी राजभाषा दिनाच्या मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विट केले आहे की ‘भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची मजा वेगळी आहे. मी लहानाचा मोठा मुंबईतील ‘साहित्य सहवास’ सोसायटी मध्ये झाल्याने मराठी भाषेचे संस्कार आपोआप होत गेले आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला. मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा!’
भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषेची मजा वेगळी आहे. मी लहानाचा मोठा मुंबईतील 'साहित्य सहवास' सोसायटी मध्ये झाल्याने मराठी भाषेचे संस्कार आपोआप होत गेले आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला. मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 27, 2021
काहीदिवसांपूर्वी सचिन झाला होता ट्रोल
काही दिवसांपूर्वी भारतात शेतकरी आंदोलन तापलेलं असताना सचिनने त्याबाबत एक ट्विट केले होते. ज्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याच्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
सचिनची कारकिर्द –
सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने ५१ शतकांसह १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत ४६ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ४६३ वनडे सामन्यात ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १५४ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १ आंतरराष्ट्रीय टी२० सामनाही खेळलेला असून यात त्याने १० धावा केल्या असून १ विकेट घेतली आहे.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तो क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो माझ्याजवळ आला होता आणि म्हणाला…’ , सुर्यकुमारने सांगितले रोहितबरोबरची खास आठवण
फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११, कर्णधाराचं नाव खूप खास