Indian Cricketers Ganesh Chaturthi Wish: गणेश चतुर्थीचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देश-विदेशातील लोक गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. भारतीयांपासून ते परदेशी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वजण लंबोदराच्या भक्तीत न्हाऊन निघाले आहेत. काही क्रिकेटपटूंनी मोठ्या थाटामाटात बाप्पाचे स्वागत केले आहे. भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरनेही आपल्या घरी बाप्पा विराजमान केले आहे. गणपती पूजेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सचिन तेंडुलकरने गणपतीची पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या 36 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा देव गणपतीची आरती करताना दिसत आहे. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
व्हिडिओसोबत सचिनने लिहिले की, “विघ्नहर्ता… गजानना… मूषकवाहना”, आपण जेव्हा आपल्या घरात भगवान गणेशाचे स्वागत करतो, तेव्हा तो सर्व अडथळे दूर करून आपले जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून टाकतो.
“विघ्नहर्ता… गजानना… मूषकवाहना”
As we welcome Lord Ganesha into our homes, may he remove all obstacles and fill our lives with joy and prosperity.
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!#GaneshChaturthi pic.twitter.com/ajnzP6WDtr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 7, 2024
डेव्हिड वॉर्नरनेही दिल्या शुभेच्छा
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नरनेही गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये श्रीगणेशाच्या फोटोसह त्याने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. डेविड वॉर्नरच्या या इंस्टाग्राम स्टोरीवरुन पुन्हा एकदा त्याचे भारतावरील प्रेम दिसून आले आहे.
Happy Ganesh Chaturthi 🙏🏻 pic.twitter.com/my734fJxX2
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) September 7, 2024
तसेट भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलनेही गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्याने एक्स वर गणपतीचे 2 फोटो शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा असे लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तो तुमच्या पाठीमागे बोलत नाही, पाकिस्तानला गंभीरसारख्या कोचची गरज; कुणी केलं विधान?
आता होणार धिंगाणा! पंत जुन्या फॉर्मात परतला, दुलीप ट्रॉफीत झळकावले वेगवान अर्धशतक
19 वर्षीय खेळाडू करणार भारतीय संघात पदार्पण? माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा