सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्राॅफीच्या (Duleep Trophy) स्पर्धेत अनेक युवा खेळाडू त्यांच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहेत. तत्पूर्वी या दुलीप ट्राॅफी स्पर्धेत 19 वर्षाच्या फलंदाजाने चमकदार फलंदाजी करून दिग्गज खेळाडूंकडून प्रशंसा मिळवली आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून भारतासाठी पदार्पण केलेल्या सरफराज खानचा भाऊ मुशीर खान (Musheer Khan) आहे. मुशीर सध्या त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आहे.
मुशीर खानने (Musheer Khan) बेंगळुरू येथे सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-अ विरुद्ध इंडिया-ब संघासाठी 181 धावांची तुफानी खेळी करून सर्वांना प्रभावित केले. त्याच्या खेळीमुळे इंडिया-ब संघाने पहिल्या डावात 321 धावा केल्या. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू विजय दहियाने (Vijay Dahiya) एका व्हिडिओमध्ये पीटीआयशी बोलताना सांगितले की, “मुशीरची मानसिकता वेगळी आहे कारण तो मजबूत मानसिकता असलेला खेळाडू आहे.”
विजय दहिया म्हणाला की, “मी भविष्यवाणी करू शकत नाही, पण मुशीर धावा करत राहिल्यास तो भारतीय संघासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्या फलंदाजीची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे सातत्य. त्याने रणजी करंडक उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत धावा केल्या आणि त्यानंतर 2024 मध्ये देशांतर्गत क्रिकेटच्या पहिल्या दिवशी शतक ठोकले. मुशीरने डावखुरा फिरकीपटू म्हणून सुरुवात केली आणि नंतर फलंदाजीमध्ये येथे पोहोचणे हे दर्शविते की जर तुम्ही कठोर परिश्रम घेत असाल तर ती नक्कीच उपलब्धता आहे.”
मुशीर खानचा (Musheer khan) त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. आतापर्यंतच्या छोट्याशा कारकीर्दीत तो चमकदार कामगिरी करत आहे. त्याने 7 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 203 आहे. आतापर्यंत त्याने रेड बॉल फॉरमॅटमध्ये 11 डावांमध्ये 64.54 च्या सरासरीने 710 धावा ठोकल्या आहेत.
मुशीर खानने (Musheer Khan) इंडिया-अ विरुद्ध 181 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने 16 षटकार आणि 5 उत्तुंग षटकार ठोकले. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 48.53 राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
Duleep Trophy: भारताच्या ‘या’ स्टार फिरकीपटूची खतरनाक गोलंदाजी, घेतल्या 7 विकेट्स
“तेंडुलकरने अख्तरला खतरनाक…” 2003च्या विश्वचषकाची आठवण करून देत ‘या’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
Duleep Trophy: रुतुराज गायकवाडच्या संघाची शानदार विजयाने सुरुवात!