क्रिकेटमधून निवृत्त झालेले माजी दिग्गज आजवर आपल्याला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series)च्या माध्यमांतून मैदानावर खेळताना दिसले आहेत. आता दिग्गज क्रिकेटपटूंसाठी अजून एक क्रिकेट लीग पुढे आली असून याचे नाव लिजेंड्स क्रिकेट लीग (Legends Cricket League) असे आहे. ओमानमध्ये २० जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत भारतासह ३ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारताचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) हादेखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता या सर्व अफवा असल्याचे समजत आहे.
‘१०० एमबी’ म्हणजेच १०० मास्टर ब्लास्टर नामक सचिनच्या अधिकृत ट्वीटर ऍपवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachachan) यांचा लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे सांगतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. लिजेंड्स क्रिकेट लीगचे ब्रँड अँबेसेडर (Brand ambassador Of LCL) असलेले बच्चन या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सचिनचे नाव घेत तो या लीगचा भाग असल्याचे सांगताना दिसतात.
यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिले आहे की, ‘सचिन तेंडूलकरचे लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त खरे नाही. आयोजकांनी क्रिकेट चाहत्यांची आणि अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करू नये. त्यांच्या या ट्वीटवरून सचिन लिंजेड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट होते.’
दरम्यान लिजेंड्स क्रिकेट लीग ही निवृत्त क्रिकेटपटूंसाठी एक व्यावसायिक लीग आहे, ज्यामध्ये तीन संघ सहभागी होतील. इतर दोन संघ आशिया आणि उर्वरित जगाचे आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे या लीगचे आयुक्त आहेत.
The news about @sachin_rt’s participation in ‘Legends League Cricket’ is not true.
The organisers should refrain from misleading cricket fans and Mr. Amitabh Bachchan.
– Official spokesperson, SRT Sports Management Pvt. Ltd. https://t.co/Uyjc5721UM
— 100MB (@100MasterBlastr) January 8, 2022
भारताचे कोणते दिग्गज खेळताना दिसतील?
या लीगमध्ये भारतीय संघाचे नाव इंडिया महाराजा असे असून या संघात सेहवाग, युवराज आणि हरभजन व्यतिरिक्त इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी यांचा समावेश आहे. मोहम्मद कैफ आण स्टुअर्ट बिन्नी हेदेखील संघात सहभागी झाले आहेत.
इतर देशाचे दिग्गज खेळाडूही खेळतील
आशिया लायन्स नावाच्या आशियाई संघात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कलुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, सनथ जयसूर्या, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ आणि उमर गुल सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणही आशियाई संघाचा भाग असेल. तर तिसऱ्या संघातील खेळाडूंची घोषणा अद्याप झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ
टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! आता तिसऱ्या कसोटीत ‘या’ खेळाडूच्या उपस्थितीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह
हेही पाहा-