मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे मुंबईत वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आज त्यांच्या रहात्या घरी संध्याकाळी 6.30 वाजता शेवटचा श्वास घेतला.
आचरेकर यांचा जन्म 1932 मध्ये झाला होता. त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी अशा क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच त्यांनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे.
त्यांना 1990 मध्ये त्यांच्या प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल द्रोणाचार्य हा पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच 2010 मध्ये त्यांना भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्याचवर्षी त्यांचा गॅरी कर्स्टन यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता.
https://twitter.com/BCCI/status/1080461198884126720
महत्त्वाच्या बातम्या:
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
–टीम इंडियावर चिडले चाहते, असा केला राग व्यक्त
–भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमधून बाहेर?