रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना काल म्हणजेच १७ मार्च रोजी खेळवला गेला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सच्या संघाने अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिज लिजेंड्सचा पराभव केला. या विजयासह त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत त्यांचा सामना श्रीलंका लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील विजेत्याशी होईल.
इंडिया लिजेंड्सच्या कालच्या विजयात कर्णधार सचिन तेंडुलकरचा महत्वाचा वाटा होता. त्याने भारताकडून सर्वाधिक ४२ चेंडूत ६५ धावा करत संघाची धावसंख्या २१८ पर्यंत पोहोचवली. मात्र त्याच्या या खेळीतील एका फटक्याची आता जोरदार चर्चा होत आहे.
चाहत्यांना आली २००३ विश्वचषकाची आठवण
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. डावाच्या सुरुवातीला सेहवाग आक्रमकपणे खेळत असल्याने सचिनने काहीसा सावध पवित्रा स्विकारला होता. मात्र सेहवाग बाद झाल्यानंतर सचिनने डावाची सूत्रे हाती घेत चौफेर फटकेबाजी केली.
यातच वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्टला एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुलचा फटका मारत षटकार ठोकला. त्याचा हा फटका पाहून सोशल मिडीयावर चाहत्यांना २००३ च्या विश्वचषकाची आठवण आली. या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सचिनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँड्रय़ू कॅडिकला असाच फटका मारला होता. चाहत्यांनी तर या दोन्ही फटक्यांचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
2003 – 2021 ????#RoadSafetyWorldSeries #SachinTendulkar pic.twitter.com/aX3hmYt1xH
— ???????????????????????? (@Shebas_10dulkar) March 17, 2021
दरम्यान, सचिनच्या खेळीनंतर युसूफ पठाण आणि युवराज सिंग यांनी तुफानी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या २१८ पर्यंत नेली. त्यावेळी हा सामना ते सहजपणे जिंकतील, असे वाटले होते. पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कडवी झुंज देत सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगवला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दबाव हाताळत योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि भारताचा विजय सुनिश्चित केला.
महत्त्वाच्या बातम्या –
इरफानने पहिल्या षटकात लुटल्या खूप धावा, मग सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी मिळाली प्रेरणा अन्…
‘हे’ पाच खेळाडू गमावू शकतात आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील सामने, जाणून घ्या कारण
टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका






