भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काल (8 जुलै) 46 व्या वर्षात पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट विश्वात दादा म्हणुन प्रसिद्ध असलेल्या गांगुलीला काल अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मात्र यापैकी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या माजी कर्णधाराला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला.
सचिनने काल सौरव गांगुलीला ट्विटरवरुन खास बंगाली भाषेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
“दादा, तुझा आजचा दिवस आनंदाने आणि प्रेमाने भरलेला असो. पूर्ण वर्षभर दादागीरी करण्यासाठी तुला शुभेच्छा” बंगाली भाषेत अशाप्रकारे सचिनने गांगुलीला शुभेच्छा दिल्या.
দাদা – আপনার জন্মদিন সুখ আর ভালোবাসায় ভরে উঠুক ।। Wish you a year full of দাদাগিরি, @SGanguly99 😜 pic.twitter.com/xDzE2N3NOS
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 8, 2018
सौरव गांगुली आणि सचिन मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. या दोघांनी मिळून अनेकवेळा भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिले आहेत.
भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी जोडी असणाऱ्या सचिन-गांगुलीने जवळपास दहा वर्ष भारताच्या डावाची त्यांनी सुरवात केली आहे.
या जोडीने भारतासाठी 136 सामन्यात डावाची सुरवात केली आहे. यामध्ये सचिन-गांगुलीने 49.32 च्या सरासरीने 6,609 धावा केल्या आहेत.
तसेच आतंतराष्ट्रीय क्रिकेटमधील जगातील सर्वकालीन यशस्वी सलामीवीरांच्या यादीतही सचिन-गांगुली अव्वल स्थानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हार्दिक पंड्याचा भिमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
-तिसरी टी२० गाजवलेले दोन भारतीय सेहवागकडून ट्रोल