भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या सुट्यांचा आनंद घेत आहे. नुकतेच सॅक्रिड गेम्स या नेटफ्लिक्सवरील मालिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडेने धोनीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
याबरोबरच तिने धोनीला तिचे सॅक्रिड गेम्स मालिकेतील काम आवडले असल्याचीही माहीती दिली. तसेच त्याच्या बरोबर घालवलेला वेळ हा तिच्यासाठी फॅन मुमेंट असल्याचेही तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.
When he said he loved my work in @SacredGames_TV Matlabbbbbb total Siyaaapaaa 😍 My fan moment with amazing @msdhoni .. Thank you @sapnabhavnani 😘 pic.twitter.com/RLj5eTft4C
— Rajshri Deshpande (@rajshriartist) July 27, 2018
तिच्या या ट्विटला रिट्विट करताना सॅक्रिड गेम्सचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी धोनीला सॅक्रिड गेम्स आवडला असे म्हटले आहे.
@msdhoni loved Sacred Games .. hmmm https://t.co/L168OwSnUK
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 27, 2018
राजश्री देशपांडेने या मालिकेत गणेश गायतोंडे या पात्राच्या पत्नीची भूमीका केली आहे. तिच्या या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले आहे.
एमएस धोनीने 3 वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्यानंतर भारतात परतला आहे. या मालिकेत त्याने केलेल्या संथ फलंदाजीमुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ
–ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!
–काय सांगता! कपिल देव पुन्हा एकदा भारताकडून खेळण्यासाठी सज्ज