फिफा विश्वचषक 2022च्या दरम्यान एक दुखद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा फर्स्ट डिवीजन क्लब एटलेटिको तुकुमानचा मिडफिल्डर आंद्रेस बलानता (Andrés Balanta) याचे निधन आहे. या फुटबॉलपटूचे वय अवघे 22 वर्ष होते. 2019मध्ये आंद्रेसने कोलंबिया संघासाठी इंडोनेशियामध्ये 20 वर्षाखालील विश्वचषकही खेळला होता.
आंद्रेस बलानता याचा 23वा वाढदिवस 18 जानेवारीला होता. त्याच्या वयात सर्वाधिक लोक आपल्या कारकिर्दीची सुरूवात करतात, मात्र आंद्रेसचा अचानक मृत्यू झाला. तो मंगळवारी (29 नोव्हेंबर) एटलेटिको तुकुमान क्लबसाठी सराव करत होता. त्याच दरम्यान तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्याला गंभीर दुखापत देखील झाली होती. त्यामुळे त्याला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेले, जेथे त्याला मृत घोषित केले गेले.
आंद्रेसला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी त्याच्यावर क्लबच्या मेडिकल स्टाफनेही जमेल तेवढे उपचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी देखील त्यांचा प्रयत्न सुरूच ठेवला, मात्र त्यांना अपयश आले.
कोलंबियाने फुटबॉल फेडरेशनने ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोलंबिया फुटबॉल फेडरेशनला कोलंबिया राष्ट्रीय संघाचा खेळाडू आंद्रेस बालांटा यांच्या निधनाबद्दल खेद आहे.”
La Federación Colombiana de Fútbol lamenta el fallecimiento de Andrés Balanta, jugador de la @FCFSeleccionCol en sus diferentes categorías. Enviamos nuestras condolencias a sus familiares, amigos y allegados. Q.E.P.D. pic.twitter.com/mqBTgfkAf2
— Selección Colombia (@FCFSeleccionCol) November 29, 2022
माध्यमातील रिपोर्ट्सनुसार, एटलेटिको तुकुमान क्लबचे खेळाडू नुकतेच सुट्ट्यांचा आनंद घेऊन परतले होते आणि सरावाला सुरुवात केली होती. त्यांचा सरावाचा हे पहिलेच सत्र होते. एटलेटिको क्लबचे अधिकारी इग्नासियो गोलोबिस्की म्हणाले, “आंद्रेस बलानता याच्या निधनाबाबत बोलताना दुख होत आहे. क्लबचे सर्व लोक निराश असून त्यांना धक्काच बसला आहे. त्याच्या कुटुंब, मित्रपरिवाराला आमचे पूर्ण मार्गदर्शन आहे.”
2019च्या विश्वचषकात खेळललेल्या आंद्रेसला 2021मध्ये क्लबने करारबद्ध केले होते. त्याच्याआधी तो कोलंबियाचा क्लब डेपोर्टिवो काली यासोबत होता. 2019ला देखील तो अशाचप्रकारे मैदानात कोसळला होता. त्यावेळी ग्लुकोजच्या कमतरतेमुळे त्याची शुद्ध हरपल्याचे कारण डॉक्टरांनी दिले होते. Sad news during the FIFA World Cup Atlético Tucumán midfielder Andrés Balanta dies
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या लिलावाची तयारी सुरु, पाहा कोणत्या देशाचे खेळाडू सर्वात जास्त
ओडिशा एफसी सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील, नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणांच्या शोधात