Derek Stirling Death: क्रिकेटविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. बुधवारी (दि. 13 डिसेंबर) न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू डेरेक स्टर्लिंग यांचे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डेरेक हे न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज होते. त्यांनी 1984 ते 1986 यादरम्यान न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
डेरेक स्टर्लिंग यांची लहान कारकीर्द
डेरेक स्टर्लिंग (Derek Stirling) यांनी न्यूझीलंड (New Zealand) संघाकडून 2 वर्षांच्या कारकीर्दीत फक्त 6 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी कसोटीत 13 विकेट्स घेतल्या होत्या, तर वनडेत त्यांना 6 विकेट घेण्यात यश आले होते. रिचर्ड हॅडली, इवेन चॅटफील्ड आणि लान्स केर्न्स यांसारख्या न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. त्यांच्याच युगात खेळलेल्या स्टर्लिंग यांना राष्ट्रीय संघासाठी अधिक सामने खेळता न येणे हे दुर्दैवी होते.
स्टर्लिंग यांचे देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त आकडे
असे असले, तरीही स्टर्लिंग यांचे देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे भारावून टाकणारे आहेत. ते वेलिंग्टन संघाकडून 1988 ते 1992 दरम्यान खेळण्यापूर्वी 1981 ते 1988 दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळले होते. उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज असलेल्या स्टर्लिंग यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या.
https://twitter.com/rameshwarsunth1/status/1734854546751730170
खरं तर, 84 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये स्टर्लिंग यांनी 33.72च्या सरासरीने आणि 3.58च्या इकॉनॉमी रेटने तब्बल 206 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान 75 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. तसेच, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 65 सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी 22.26च्या सरासरीने आणि 4.23च्या इकॉनॉमी रेटने 90 विकेट्स घेतल्या होत्या. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. (sad news Former New Zealand cricketer Derek Alexander Stirling passes away at the age of 62)
हेही वाचा-
पॅट कमिन्सबद्दल भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘आयपीएल लिलावात त्याच्यावर…’
Usman Khawaja Shoe Controversy: ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या बुटांवरील संदेशाने वादाला ठिणगी, प्रकरण काय?