काल (3 मार्च) कोलकाता येथे बंगाल विरुद्ध कर्नाटक संघात (Bengal Vs Karnataka) रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना (2nd Semi-Final) पार पडला. हा सामना बंगालने 174 धावांनी जिंकत 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
या सामन्यानंतर भारताचा कसोटी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) बंगालच्या संघात अंतिम सामन्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. हा संघ 9 मार्चपासून सौराष्ट्र संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
अंतिम सामन्यात बंगाल संघाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक रमनच्या जागी साहाला संघात खेळण्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
साहा सध्या भारतीय संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी गेला होता. मात्र त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली नाही.
यापुर्वी साहा बंगाल संघाकडून 2017-18च्या रणजी हंगामात खेळला होता. तेव्हा त्याने 4 सामन्यात 38.33च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
संघ निवडकर्त्यांनी साहाव्यतिरिक्त उदयोन्मुख फलंदाज सुदीप घरामी यालाही अंतिम सामन्यासाठी बंगाल संघात स्थान दिले आहे. उपांत्य फेरीत कर्नाटक संघाचा पराभव करणाऱ्या 16 खेळांडूंच्या संघात असे 2 मुख्य बदल करण्यात आले आहेत. तर, दुखापतग्रस्त कौशिक घोष आणि गुलाम मुस्तफा यांना संघातून बाहेर करण्यात आले आहे.
असा आहे अंतिम सामन्यासाठी बंगाल संघ –
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), मनोज तिवारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अनस्तुप मुजूमदार, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), सुदीप चटर्जी, अभिषेक रमण, अर्णब नंदी, शाहबाज अहमद, ईशान पोरेल, श्रेयन चक्रवर्ती, निलकंठ दास, मुकेश कुमार, आकाश दीप, अग्निव पान, सुदीप घरामी.
महत्त्वाच्या बातम्या-
–निवडकर्त्यांच्या शर्यतीत भारताचा वेंकटेश प्रसाद आणि हे खेळाडू…
–टीम इंडियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये जिंकायचे असेल तर करावी लागेल ही महत्त्वाची गोष्ट
–ऐकावे ते नवल! मुंबई इंडियन्सची किंमत ऐकून हादराल