---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यात साई किशोरला अश्रू अनावर, दिग्गज क्रिकेटपटूनेही केली भावूक पोस्ट

On: मंगळवार, ऑक्टोबर 3, 2023 5:30 PM
Sai Kishore get emotional during India's national anthem
---Advertisement---

आशियाई गेम्समध्ये भारतीय पुरुष संघाने मंगळवारी (3 ऑक्टोबर) आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला. भारताने या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. आपल्या आधीच्या प्रदर्शनामुळे भारताला थेट उपांत्यपूर्ण सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली होती. 26 वर्षीय साई किशोर याला पदार्पणावेळी अश्रू अनावर झाले. भारतीय संघाचा दिग्गज दिनेश कार्तिक याने साई किशोरसाठी एक भावून पोस्ट केली.

उभय संघातील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. निर्धारीत 20 षटकांमध्ये भारताने 4 विकेट्सच्या नुकसानावर 202 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयसवाल याने 49 चेंडूत 100 धावांची सर्वोत्तम खेळी केली. प्रत्युत्तरात नेपाळ संघाने 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या. भारतासाठी रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात साई किशोर (Sai Kishore) याने 4 षटकात 25 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ राष्ट्रगीत म्हणत असताना साई किशोरच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर त्याच्या सहकारी आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने खास पोस्ट केली.

कार्तिकने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “कठोर परिश्रम घेणाऱ्यांना देव त्याच्या पद्धतीने फळ देतो. देशांतर्गत क्रिकेटममध्ये व्हाईट बॉलने त्याने आपला दबदबा तयार केला. तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार आहे आणि मी त्याच्यासाठी जास्त आनंदी होऊ शकत नाही. सकाळी उठलो तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे नाव होते. हे पाहून मी भावूक झालो. तुमची इच्छा असेत की, काही लोकांनी चांगली कामगिरी करावी. या यादीत साई किशोर माझ्यासाठी नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याने ज्या पद्धतीने आपल्या फलंदाजीत सुधारणा केली, त्यातून तुम्हाला त्याच्याविषयी सर्वकाही समजते. त्याच्या फलंदाजीतील सुधारणा हैराण करणारी होती. तेव्हापासूनच तो एक असा खेळाडू बनला, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारात विश्वास ठेवला जाऊ शकतो. त्याच्याविषयी मी अजून खुपकाही बोलू शकतो. पण सध्या तो भारतासाठी खेळतोय हे पाहून खुश आहे. हे यश त्याच्यकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.”

दरम्यान, साई किशोर याने देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे अप्रतिम राहिले आहेत. मंगळवारी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना त्याने एक विकेठ घेतलीच. पण सोबतच श्रेत्ररक्षण करताना तीन झेल देखील पकडले. त्याच्या एकंदरीत कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यायने तमिळनाडूसाठी 30 प्रथम श्रेणी, 46 लीस्ट ए आणि 50 देशांतर्गत टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याला अनुक्रमे 113, 73 आणि 58 मिळाल्या आहेत. (Sai Kishor breaks down in tears on his debut match, Dinesh Karthik also posted an emotional post)

महत्वाच्या बातम्या – 
भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू होणार गांधी-जिना ट्रॉफी? विश्वचषकातील सामन्याआधी आला प्रस्ताव
यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---